IND Vs NZ :टीम इंडियाने न्यूझीलंडला 350 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण न्यूझीलंडचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. फिन ए्ँलेन 40 तर डेवोन कॉन्वे 10 धावा करून आऊट झाला होता.
IND Vs NZ : पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला आहे. मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजी आणि शुभमन गिलच्या डबल सेंच्यूरीच्या बळावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला आहे.या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाने न्यूझीलंडला 350 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण न्यूझीलंडचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. फिन ए्ँलेन 40 तर डेवोन कॉन्वे 10 धावा करून आऊट झाला होता. यानंतर मैदानात उतरलेला खेळाडू एकेरी दुहेरी धावसंख्या आऊट झाला होता. निकोलस 18, मिचेल 9, ट़ॉम लॅथम 24, ग्लेन फिलीप 11 धावा करून आऊट झाले होते.
न्यूझीलंडचे एका मागून एक विकेट पडत असताना मायकल ब्रेसवेल मैदानात उतरला होता. मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सॅन्टनरने
टीचून फलंदाजी केली. मायकल ब्रेसवेल शतकी खेळी केली तर सॅन्टनरने अर्धशतक ठोकेले. या दोन्ही खेळाडूंनी न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा शेवटपर्यंच जीवंत ठेवल्या होत्य़ा. तसेच टीम इंडियाच्य़ा हाता-तोंडाशी आलेला विजय हिसकावण्याचा प्रयत्न केला होता.
2023-01-18T16:30:49Z dg43tfdfdgfd