IND VS NZ FINAL : टीममध्येही नव्हता, अचानक एन्ट्री, रोहितने संधी दिल्यावर भारताला जिंकवून दिली चॅम्पियन ट्रॉफी, कोण आहे तो मॅचविनर?

मुंबई : चॅम्पियन टीम इंडिच्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंड संघावर ४ विकेटने विजय मिळवत विजेतेपदाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडिया संपूर्ण स्पर्धेमध्ये अपराजित राहिली, साखळी फेरीपासून एकही सामना गमावला नाही. टीम इंडियाविरूद्ध कोणाचाही निभाव लागू शकला नाही. यंदाची चॅम्पियन ट्रॉफी जिंकत टीम इंडियाने तिसऱ्यांदा हा कारनामा केला आहे. आयसीसीच्या दोन ट्रॉफी रोहितने आपल्या नावावर केल्या असून आता वन डे वर्ल्ड कप त्याचं टार्गेट आहे. रोहितने सामना संपल्यावर आपण निवृत्ती घेत नसल्याचं जाहीर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वांनी सांघिक कामगिरी करत प्रत्येक सामन्यात आपले १०० टक्के योगदान दिले. पण सगळ्यात खतरनाक एक निर्णय ठरला तो म्हणजे जसप्रीत बुमराहच्या जागेवर झालेल्या खेळाडूची निवड. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.चॅम्पियन ट्रॉफीसाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतीय संघात बुमराहला स्थान देण्यात आले होते. मात्र तो दुखापती असल्याने त्याच्या जागी निवड समितीने वरूण चक्रवर्ती याची निवड करत सर्वांना धक्का दिला. कारण कोणलाही त्याच्याकडून काहीच आशा नव्हती. त्याची निवड चुकीची मानली जात होती. कारण संघामध्ये आधीच तीन स्पिनर्स होते त्यामुळे त्याच्या निवडीवरून वाद झाला. परंतु पठ्ठ्याने सर्वांना अंदाच चुकीचा ठरवत दमदार प्रदर्शन करत चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपल्या फिरकीच्या तालावर विरोधी संघाच्या फलंदाजांना नाचवलं.दरम्यान, सेमी फायनलमध्येही वरूण चक्रवर्ती याने दोन विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर काल झालेल्या फायनलमध्ये त्याने परत एकदा संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली. दहा ओव्हरमध्ये त्याने ४५ धावा देत २ विकेट घेतल्या, न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीने टीम इंडियाच्या गोलंदाजांवर आक्रमण करत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायला सुरूवात केलेली. मात्र रोहितने वरूणकडे चेंडू सोपवला. मग काय पठ्ठ्याने यंग याल बाद करत पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. तीन सामन्यामध्ये त्याने ९ विकेट आपल्या नावावर केल्या. महत्त्वाचं म्हणजे याच मैदानावर त्याने अखेरचा सामना खेळला होता. आता मॅचविनर बनत त्याने कमबॅक केले.

2025-03-10T05:42:17Z