IPL 2023 : "SWEET SEASON OF MANGOES"! मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी नवीन उल हकची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर पोस्ट टाकली मग...

MI IPL 2023 : आयपीएल 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात बुधवारी मुंबई इंडियन्सच्या संघाने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये दणक्यात एन्ट्री केला आहे. गौतम गंभीरच्या लखनऊ टीमचा खेळाडू नवीन उल हकने जबरदस्त बॉलिंग केली. मात्र बँटिंग करताना गौतमची टीम फ्लॉप ठरली. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंनी लखनऊचं विजेतेपदाचं स्वप्न धुळीत मिळवलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या टीमसह आकाश आणि नीता अंबानी यांच्या आनंद गगणात मावत नव्हता. 

दुसरीकडे आयपीएलमध्ये चमकदार कामगिरीकरूनही लखनऊचा स्टार खेळाडू नवीन-उल-हक हा सोशल मीडियावर कायम ट्रोल होतोय. विराट कोहलीशी झालेल्या वादानंतर तो चाहत्यांच्या कायम निशाण्यावर आहे. यावेळी तर मुंबईच्या खेळाडूंनी त्याला लक्ष्य केलं. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन त्यांनी नवीनची खिल्ली उडवली. (IPL 2023 sweet season mangoes mumbai indians players Instagram post naveen ul haq trolled lsg vs mi eliminator)

त्यानंतर सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरु झाला. #mangoes आणि "Sweetmangoes हे हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कारण मुंबईच्या खेळाडूंनी आंब्याचा एक फोटो शेअर केला. 

काय आहे पोस्ट ? 

या पोस्टमध्ये बईचे तीन खेळाडू संदीप वारियर, विष्णू विनोद आणि कुमार कार्तिकेय दिसत आहे. ते राऊंटड टेबलजवळ बसले आहेत. त्या टेबल तीन आंबे आहेत आणि या तिघांनी गांधीजींच्या तीन माकडांच्या स्टाइलमध्ये पोज दिली आहे. हे तिघ एकाप्रकारे नवीन उल हकल याला डिवचतात आहे, असं काहीस हा फोटो बोलतोय. 

आरसीबी स्पर्धेतून बाद झाल्यानंतर नवीनने इन्स्टाग्रामवर हसणारा मीमचा व्हिडिओ अपलोड केला होता. त्यानंतर जेव्हा बुधवारी लखऊनची टीम स्पर्धेतून बाहेर गेली मुंबईच्या टीमच्या या तिघांनी हा फोटो शेअर केला. संदीप आणि विष्णूने यांनी त्यांचा इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला. त्यानंतर सोशल मीडियावर एकच वादळ उडलं. जो तो mangoes वरुन सोशल मीडियावर चर्चा करु लागलं. मात्र काही वेळात संदीप आणि विष्णूने ही इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट केली. 

पण एका ट्विटर वापरकर्त्याने त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो त्याच्या प्रोफाइलवर अपलोड केल्यानंतर ट्वीटरवर ट्रेंड सुरु झाला. 

दरम्यान लखनऊ सुपर जायंट्ससाठी ही सलग दुसरी नामुष्की ओढवली आहे.

यापूर्वीही लखनऊ प्लेऑफमध्ये पोहोचूनही टॉफीवर आपलं नाव कोरु शकलं नाही. नवीन-उल-हकने आयपीएल 2023 एलिमिनेटरमध्ये 4 विकेट्स घेतल्या.

पण टीमला त्याचा या बॉलिंगचा फायदा झाला नाही. त्याने  4/38 असा शानदार स्पेल टाकत रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांची विकेट्स घेतले. 

 

2023-05-25T03:02:56Z dg43tfdfdgfd