गोपाळ गुरव, पुणे : टी-२० वर्ल्ड कपला आज सुरुवात झाली. टी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवशी आता भारताच्या क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. महेंद्रसिंग धोनीचा तो लाडका होता. त्यामुळे धोनीच्या स्टाइलमध्येच त्याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि कामचलाऊ फिरकी गोलंदाज केदार जाधवने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३९ वर्षीय केदार भारताकडून अखेरचा वन-डे सामना फेब्रुवारी २०२०मध्ये, तर अखेरचा टी-२० सामना २०१७मध्ये खेळला होता. त्यामुळे त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे कधीच बंद झाले होते.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्य राखल्यानंतर वयाच्या २९व्या वर्षी त्याला आंतरराष्ट्रीय वन-डेमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने रांचीत पदार्पणाचा वन-डे सामना खेळला. यात तो केवळ २० धावांवर बाद झाला. तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या वरदहस्तामुळे केदार भारतीय संघाकडून ७३ वन-डे आणि नऊ टी-२० सामने खेळला. यानंतर केदारची संघातील भूमिका काय म्हणून त्याच्यावर जोरदार टीका होऊ लागली. अखेर त्याला संघातील स्थान गमवावे लागले. यानंतर पुन्हा त्याला पुनरागमन करता आले नाही.
वन-डे ७३ १३८९ ४२.०९ १२० २-६
टी-२० ९ १२२ २०.३३ ५८ ०-१
प्रथम श्रेणी ८७ ६१०० ४८.०३ ३२७ १७-२३
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-06-03T13:34:37Z dg43tfdfdgfd