NOVAK DJOKOVIC ठरला AUSTRALIAN OPEN चा किंग, फायनल जिंकत दहाव्यांदा उचलली ट्रॉफी!

Novak Djokovic Australian Open Final: सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत (Australian Open Final) जोकोविचने ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपासचा (Stefanos Tsitsipas) सरळ सेटमध्ये पराभव केला. जोकोविचने 2 तास 56 मिनिटे चाललेला हा सामना 6-3, 7-6, 7-5 असा जिंकलाय. या विजयासह जोकोविच एटीपी क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा पुरुष खेळाडू बनला आहे. (novak djokovic defeats stefanos tsitsipas win australian open 10th time 22nd grand slam latest sports news)

जोकोविचने दहाव्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना (Novak Djokovic win australian open 10th time) खेळला आणि प्रत्येकवेळी विजेतेपदाचा मान त्याने मिळवला आहे. तसेच हे त्याच्या कारकिर्दीतील ‌‌‌‌22 वं ग्रँडस्लॅम ठरलं. त्याचबरोबर त्याने राफेल नदाल याच्या विक्रमी 22 ग्रँडस्लॅम विजेतेपदांची (Novak Djokovic 22nd grand slam) बरोबरी केली आहे.

गेल्या वर्षी लसीच्या वादामुळे जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) खेळू शकला नव्हता. त्याआधी 2019, 2020 आणि 2021 अशी सलग तीन वर्ष त्याने विजेतेपदाला गवासणी घातली होती. त्यानंतर आता यंदा पुन्हा त्याने जोरदार कमबॅक करत विजेतेपद पटकावलंय. 35 वर्षीय जोकोविचचं हे 10 वं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद आहे.

आणखी वाचा - Novak Djokovic: शेवटी लेक तो! आईसाठी जोकोविचने सर्वांसमोर असं काही केलं की..., पाहा Video

दरम्यान,  दोन वेळा फ्रेंच ओपन, सात वेळा विम्बल्डन जिंकलेल्या जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कमाल दाखवली. जोकोविचने 2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019, 2020, 2021 आणि आता 2023 मध्ये विजेतेपद पटकावलंय. 2022 मध्ये राफेल नदालने (Rafael Nadal) ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर आता पुन्हा जोकोविच किंग ठरलाय. नदालकडे 22 ग्रँडस्लॅम आहेत. त्याचबरोबर रॉजर फेडरर (Roger Federer) 20 ग्रँडस्लॅमसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

2023-01-29T13:22:39Z dg43tfdfdgfd