RANJI TROPHY : 5 सामन्यांमध्ये 553 रन्स; 'या' मराठमोळ्या खेळाडूने पुन्हा ठोठावले टीम इंडियाचे दरवाजे

कधी टीम इंडियातून (Team India) बाहेर गेलेला प्लेयर चांगलं प्रदर्शन करून चर्चेचा विषय ठरतो. अशातच सध्या लाईमलाईटमध्ये आलाय टीम इंडियाचा एक खेळाडू

Kedar Jadhav: रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) 2022-23 मध्ये कोणत्या ना कोणत्या खेळाडूचा उत्तम फरफॉर्मन्स पहायला मिळतोय. यामध्ये कधी कोणी नवखा खेळाडू तर कधी टीम इंडियातून (Team India) बाहेर गेलेला प्लेयर चांगलं प्रदर्शन करून चर्चेचा विषय ठरतो. अशातच सध्या लाईमलाईटमध्ये आलाय टीम इंडियाचा खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav). हे नाव भारतीय चाहत्यांसाठी काही वेगळं नाही. 

केदार जाधवची खेळी प्रत्येकाने पाहिली आहे. टीम इंडियामध्ये स्थान न मिळालेल्या केदार जाधवची बॅट रणजी ट्रॉफीमध्ये धुमाकूळ घालतेय. त्याच्या तुफान फलंदाजीने गोलंदाजांची धुलाई केली आहे. सध्या तो ज्या फॉर्ममध्ये खेळतोय, त्यानुसार चाहत्यांना तो टीम इंडियामध्ये पुन्हा एकदा खेळताना दिसण्याची शक्यता आहे. 

रणजी ट्रॉफीमध्ये Kedar Jadhav नावाचं तुफान

भारतात सध्या रणजी 2022-23 खेळवली जात आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू केदार जाधवने तुफान फलंदाजी करत पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा मराठमोळा खेळाडू चाहत्यांना टीम इंडियाकडून खेळाताना दिसू शकतो. 

केदार जाधवच्या खेळाडूची आकडेवारी

रणजी ट्रॉफीमध्ये 2022-23 केदार जाधवने गेल्या 5 डावांमध्ये 553 रन्स केले आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने बॅक-टू-बॅट उत्तम कामगिरी केली आहे. या डावांमध्ये त्याने 110.6 च्या सरासरीने 85 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. ज्यामध्ये 2 शतकं आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

रणजी ट्रॉफीमध्ये 2022-23 जाधवचं प्रदर्शन

  • 128(168) विरूद्ध मुंबई
  • 71(92) विरूद्ध हैदराबाद
  • 56(78) आणि 15(29) विरूद्ध तमिलनाडु
  • 283(283) विरूद्ध आसाम

2023-01-27T12:20:56Z dg43tfdfdgfd