ROHIT KISSES TO HARDIK PANDYA: हार्दिकच्या चालू मुलाखतीत रोहितची एंट्री, मग हिटमॅनने अचानक केले 'असे' काही की पाहून सगळ्यांनाच आनंद झाला

बार्बाडोस: टी-२० वर्ल्ड कप २०२४चा विजेतेपदावर भारताने आपले नाव कोरले. पूर्ण वर्ल्ड कपमध्ये एकही सामना न गमावता वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिली टीम ठरली. भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी धुव्वा उडवला आणि चॅम्पियन बनण्याचा मान पटकावला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि १७७ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेला दिले. सामन्यात शेवटचे षटक हार्दिक पंड्याने फेकले आणि आफ्रिकेच्या हातातला सामना हिसकावून भारताला विजय मिळवून दिला. सामन्या संपल्यानंतर हार्दिक मुलाखत देत असताना कर्णधार रोहित शर्माने त्याच्या सोबत असे काही केले की पाहून सगळ्याच चाहत्यांना आनंद झाला.

रोहितने हार्दिकसोबत केले असे काही

भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप २०२४चे विजेतेपद जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पांड्याचे चुंबन घेतले. हार्दिकने शेवटच्या षटकात टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर हार्दिक पंड्या मुलाखत देत होता त्या चालू मुलाखतीत रोहित शर्मा धावत आला आणि त्याने हार्दिकच्या गालावर किस केले आणि नंतर त्याला मिठी मारली. हार्दिकनेही रोहितला घट्ट मिठी मारली आणि भावुक झाला.

#Hardik in tears of Explaining what he gone through for the past 6 months..#Rohit Comes and Gave a Hug & Kiss to him 😭😭😭😭💙 pic.twitter.com/8IUe8rS3Dt

— Mumbai Indians TN (@MumbaiIndiansTN) June 29, 2024 ]]>

भारताविरुद्धच्या शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १६ धावांची गरज होती. हार्दिक पंड्याने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरला सूर्य कुमार यादव करवी झेल बाद केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर चौकार आला आणि त्यामुळे ४ चेंडूत १२ धावा हव्या होत्या. यानंतर हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धावा करण्याची एकही संधी दिली नाही. हार्दिकच्या या खेळ पालटणाऱ्या गोलंदाजीनंतर भारताने विजयसोबतच ट्रॉफीचा १७ वर्षांचा दुष्काळही संपवला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात १७६ धावा केल्या. विराट कोहलीने ७६ धावांची खेळी केली तर अक्षर पटेलने ४७ आणि शिवम दुबेने २७ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेचा संघ ८ बाद १६९ धावाच करू शकला. हेनरिक क्लासेनने २७ चेंडूत ५२ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. हेनरिकच्या विकेटमुळे सामना भारताकडे वळला आणि भारताने अखेर तो जिंकला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-30T04:00:07Z dg43tfdfdgfd