नवी दिल्ली: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा दमदार सलामीवीर क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ऋतुराज ३ जूनला लग्न करणार आहे. ज्या मुलीसोबत ऋतुराजचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्या मुलीचे नाव उत्कर्षा पवार असून ती स्वतः क्रिकेटर आहे. दरम्यान, ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांच्या लग्नापूर्वीच्या समारंभांना सुरुवात झाली आहे. या दोघांच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहते सतत फोटो शेअर करून त्यांचे अभिनंदन करत आहेत.
ऋतुराज आणि उत्कर्षाच्या या मेहंदी सोहळ्याचे गोड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फक्त उत्कर्षाच नव्हे तर ऋतुराजने सुद्धा आपल्या होणाऱ्या बायकोचं नाव वेगळ्याच अंदाजत आपल्या हातावर लिहिलं आहे. ऋतुराजने दोघांच्या ही नावाचं पहिलं अक्षर लिहिताना R अक्षरामध्ये क्रिकेटची बॅट दाखवली आहे आणि खाली उत्कर्षाचं पूर्ण नाव लिहीत हार्टचा इमोजी दिला आहे. तर दुसऱ्या हातावर त्यांच्या लग्नाचा हॅशटॅग त्याने वापरला आहे. #RUTURAJCAU GHTUTAKRSHA हा हॅशटॅग लिहून त्याने ३ जून २०२३ ही त्यांची लग्नाची तारीख खाली लिहली आहे. तर या व्हायरल फोटोंमध्ये उत्कर्षाची मेहंदी अजून सुरु असल्याचे दिसत आहे.
ऋतुराज गायकवाड ३ जून रोजी उत्कर्षा पवारसोबत लग्न करणार आहेत. उत्कर्षा स्वतः एक क्रिकेटर आहे आणि ती महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळली आहे. उत्कर्षा १८ महिन्यांपूर्वी शेवटचा क्रिकेट सामना खेळली होता. रिपोर्ट्सनुसार, ती सध्या पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस (INFS) मध्ये शिकत आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियामध्ये स्टँडबाय म्हणून ऋतुराजचा समावेश करण्यात आला होता पण क्रिकेटपटूने बीसीसीआयला त्याच्या लग्नाबद्दल सांगितल्यानंतर त्याच्या जागी भारताचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याला स्टँडबाय खेळाडू म्हणून इंग्लंडला पाठवण्यात आले आहे.
2023-06-02T05:36:57Z dg43tfdfdgfd