SACHIN TENDULKAR: मुंबई इंडियन्ससोबत घडलं ते पाहून सचिनचा पारा चढला, लखनऊविरुद्धच्या सामन्यात...

मुंबई: मुंबई इंडियन्सच्या संघाने बुधवारी आयपीएल एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला आणि क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला. आता त्यांचा सामना २६ मे रोजी गुजरात टायटन्सशी होणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज टीम डेव्हिडची मोठी फसवणूक झाली. मुंबई इंडियन्स संघाला थर्ड अंपायरची मोठी चूक भोगावी लागली आहे. या घटनेनंतर मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर चांगलाच संतापलेला दिसत होता.

मुंबई इंडियन्सच्या इनिंगच्या १७व्या ओव्हरमध्ये असं काही घडलं, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर मुंबई इंडियन्सच्या डावाच्या १७व्या षटकात गोलंदाजीसाठी आला. या षटकाचा तिसरा चेंडू यश ठाकूरने टाकला तेव्हा मुंबई इंडियन्सचा फलंदाज टीम डेव्हिडने त्यावर मोठा शॉट लावला. टीम डेव्हिडने शॉट मारला तेव्हा दीपक हुडाने लाँग ऑनवर कॅच पकडला. यानंतर मैदानावरील अंपायरने हाय फुल टॉस आणि नो बॉल तपासण्यासाठी थर्ड अंपायरची मदत घेतली, त्यानंतर असे काही घडले की ज्याचा कोणीही विचार केला नसेल.

रिप्लेमध्ये चेंडू टीम डेव्हिडच्या कमरेच्या वर दिसत होता. परंतु असे असूनही थर्ड अंपायरने निर्णय सुनावण्याची घाई केली आणि या फलंदाजाला बाद घोषित केले. टीम डेव्हिडला आऊट घोषित केल्यावर तो मैदानावरील पंचांवर नाराज झाला. डग आऊटमध्ये बसलेला सचिन तेंडुलकरही अंपायरच्या निर्णयाने नाराज झाला आणि आश्चर्यचकित दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यश ठाकूरने टीम डेव्हिडला अवघ्या १३ धावांवर मैदानाबाहेर पाठवलं.

2023-05-25T05:34:04Z dg43tfdfdgfd