SANJIV GOENKA REACTION AFTER KL RAHUL GREAT CATCH : राहुलने सुपरमॅन उडी घेत पकडला अफलातून कॅच, झेल घेताच मालक गोएंकांच्या रिएक्शन व्हायरल

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियम लीग (आयपीएल )चा १७ वा हंगाम आता काही दिवसातच निरोप घेणार असून आता मात्र काही संघात अटीतटीचा सामना सुरु झाला आहे. आयपीएल २०२४ चा ६४ वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झाला. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राहुलचा निर्णय तितकासा प्रभावी ठरला नाही, पण या सामन्यात कर्णधार राहुलने असा अप्रतिम झेल घेतला की, लखनौचे मालक संजीव गोएंका स्वत: उभे राहिले आणि स्टँडमध्ये टाळ्यांचा गडगडाट केला.

राहुलच्या झेलवर गोयंका यांच्या टाळ्या

काही दिवसांपूर्वी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १० विकेट्सने लाजिरवाण्या पराभूत झाल्यानंतर लखनौचे मालक संजीव गोयंका आपल्या टीमचा कर्णधार केएल राहुलवर मैदानावर चिडले आणि त्यानंतर यानंतर बराच गदारोळ झाला. कदाचित राहुल यापुढे संघ सोडणार असल्याची चर्चा आता रंगली मात्र, दिल्लीविरुद्ध सामन्यात राहुलने ज्याप्रकारे झेल पकडला त्याचे कौतुक करण्यासाठी मात्र गोएंकांनी क्षणाचाही विलंब न करता उभे राहून टाळ्या वाजवल्या.

राहुलची दमदार कामगिरी

लखनौचा फिरकीपटू रवी बिश्नोईने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात नववे षटक टाकली. बिश्नोईच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शाई हॉप स्ट्राइकवर होता. बिश्नोईच्या चेंडूवर होपने कव्हर्सवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू कव्हर्सकडे उभ्या असलेल्या राहुलने लपकला आणि होप बाद झाला व गोएंका यांनी जागेवर उभे राहून राहूलसाठी टाळ्या वाजवून कौतुक केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Appreciation all around as KL keeps his calm to take it on the second attempt 😍#DCvLSG #TATAIPL #IPLonJioCinema pic.twitter.com/QTWDDmHM0n

— JioCinema (@JioCinema) May 14, 2024 ]]>

संजीव गोएंका-राहुलचा व्हायरल व्हिडिओ

दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी राहुल आणि संघ मालक गोयंका यांच्यात तडजोड झाली आहे असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोवरून दिसत आहे. या सामन्याआधी डिनरच्या दरम्यान या दोघांची भेट झाली असून या दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-15T03:40:22Z dg43tfdfdgfd