SARA TENDULKAR : तेरे पीछे पीछे आ गयी...; शुभमनच्या मागोमाग साराही पोहोचली लंडनला, दोघांचेही फोटो होतायत व्हायरल

Sara Tendulkar : टीम इंडिया ( Team India ) सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या ( ICC World Test Championship ) तयारीमध्ये आहे. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( Ind vs Aus ) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार असून टीममधील सर्व भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचलेत. अशामध्ये टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल ( Shubman Gill ) देखील आयपीएल ( IPL 2023 ) संपवून लंडनला रवाना झाला. अशातच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) देखील लंडनमध्ये गेल्याने पुन्हा एकदा या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. 

आयपीएलसची स्पर्धा संपली असून प्लेऑफमध्ये असलेले सर्व खेळाडू इंग्लंडला पोहोचले आहे. यामध्ये रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शुभमन गिल यांचा समावेश होता. मात्र शुभमन ( Shubman Gill ) गेल्यानंतर सारा ( Sara Tendulkar ) देखील लंडनला पोहोचली आहे. दोघांचेही फोटो व्हायरल झाल्याने विविध चर्चा रंगू लागल्यात.

शुभमनचा पाठलाग करत सारा लंडनमध्ये

भारत आणि ऑस्ट्रेलिया येत्या 7 जूनपासून इंग्लंडच्या ओव्हर मैदानावर भिडणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने 15 खेळाडूंची टीम पाठवली असून 3 खेळाडू स्टँडबाय आहेत. या स्टँडबाय खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादवचा ( Suryakumar yadav ) देखील समावेश आहे. यावेळी सूर्यकुमारने शुभमन गिलसोबत ( Shubman Gill ) एक फोटो पोस्ट केलाय. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

सूर्याने शुभमनसोबतचा ( Shubman Gill ) हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना सूर्याने 'लंडन' हे लोकेशन पिन केलं आहे. तर दुसरीकडे साराने देखील तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केलाय. ज्यामध्ये ती बसली असून आजबाजूच्या नजाऱ्याचा आनंद घेतेय. दरम्यान साराचा हा फोटो देखील लंडनचा असल्याचं समोर आलं. साराने ( Sara Tendulkar ) देखील लंडन हे लोकेशन पिन करून हा फोटो पोस्ट केला. त्यामुळे शुभमनचा पाठलाग करत सारा देखील लंडनला पोहोचली असल्याचं, सोशल मीडियावर बोललं जातंय.

साराच्या आवडीचं लंडन

साराने ( Sara Tendulkar ) तिचं शिक्षण लंडनमधून केलं आहे. त्यामुळे साराला लंडन शहर फार आवडीचं असल्याचं तिच्या फोटोंवरून दिसून आलंय. 

शुभमन साराचं अफेअर?

सध्या टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill ) उत्तम फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्येही त्याने धडाकेबाज कामगिरी केली आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून सचिन तेंडुलकरची मुलगी सारा  ( Sara Tendulkar )आणि शुभमन गिलच्या अफेअरची चर्चा आहे. मात्र दोघांकडून अजूनही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

2023-06-02T15:51:09Z dg43tfdfdgfd