SHARDUL THAKUR : तुला अजून प्रयत्न...; 'त्या' फोटोनंतर रोहितची पत्नी रितीका आणि शार्दूलमध्ये झालं भांडण

Shardul Thakur : सूंपूर्ण टीम इंडिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) तयारीमध्ये व्यस्त आहे. टीम इंडियाचे खेळाडू आयपीएल संपल्यानंतर इंग्लंडसाठी रवाना देखील झाले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी 15 सदस्यांची टीम आणि 3 स्टँडबाय खेळाडू रवाना झालेत. यामध्ये ऑलराऊंडर शार्दुल ठाकुर ( Shardul Thakur ) देखील इंग्लंडला रवाना झाला आहे. दरम्यान यावेळी त्याच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे शार्दूल ( Shardul Thakur ) आणि रोहित शर्माची ( Rohit Sharma ) पत्नी रितीका सजदेह ( Ritika Sajdeh ) हिच्यासोबत वाद झाल्याचं दिसून आलंय. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा खेळाडू शार्दूल ठाकूरने सोशल मीडियावर एक फोटो केला होता. दरम्यान या फोटोवरून शार्दूल ठाकूर आणि रितीका यांच्यामध्ये भांडण झाल्याचं दिसून आलं. या दोघांचंही भांडणं सोशल मीडियावर चर्चेता विषय बनलं होतं. 

रितीकाने शार्दूल ठाकूरची केली गंमत

टीम इंडियाचा खेळाडू शार्दुल ठाकूरही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला पोहोचलाय. इंग्लंडला पोहोचून त्याने टीम इंडियासोबत प्रॅक्टिस देखील केली. दरम्यान यावेळी त्याने इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून त्याचा एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्सनमध्ये त्याने म्हटलंय की, "Let eternal forces back you instead #st54". याचा अर्थ बाहेरील सुंदरतेपेक्षा आतील शक्तीला बाहेर येऊ द्या. 

शार्दूलच्या या फोटोवर रोहितची पत्नी रितीका सजदेहने गमतीशीर कमेंट केली आहे. या कमेंटमध्ये रितीका म्हणते की, मला दिसतंय की, तू छान फोटो येण्यासाठी पोझ देतोयस. मात्र तुला अजून प्रयत्न करण्याची गरज आहे, थँक्यू. तर दुसरीकडे रितीकाच्या या कमेंटला शार्दूलने देखील उत्तर दिलंय. तो म्हणालाय, no wonder there was fire without smoke. 

शार्दूल आणि रितीका यांच्या गमतीशीर कमेंटचा हा खेळ चाहत्यांना मात्र फारच आवडलाय. यावेळी चाहत्यांनी देखील शार्दूलच्या या फोटोवर कमेंट केली आहे. 

डब्लूटीसी फायनल सामन्यासाठी टीम इंडिया

टीम इंडिया: रोहित शर्मा ( कर्णधार ), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (wk), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, इशान किशन (wk)

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव

2023-06-03T13:21:31Z dg43tfdfdgfd