SIKANDAR SHEIKH : हाच तो क्षण ज्या डावामुळे सिकंदर हरला, पहिल्यांदाच समोर आला व्हिडीओ!

हाच तो निर्णायक क्षण जिथं सिकंदरसह तमाम कुस्ती शौकिनांचं स्वप्न भंगलं, पहिल्यांदाच समोर आला तो व्हिडीओ!

Maharashtra Kesari 2023 : यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची (Maharashtra Kesari 2023) अजुनही चर्चा सुरू आहे त्याचं कारण म्हणजे सिकंदर शेख. (Sikandar Sheikh) ज्याच्या विजयापेक्षा पराभवाची जंगी चर्चा राज्यभर झाली. उपमहाराष्ट्र केसरी ठरलेल्या महेश गायकवाडने सिकंदरला सेमी फायनलमध्ये हरवलं होतं. निकालानंतर पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे सिकंदरचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे. अशातच ज्या डावामुळे सिकंदरचं महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न भंगलं त्या क्षणाचा व्हिडीओ समोर आला आहे. (Sikandar Sheikh vs Mahesh Gaikwad Semi final video latest marathi News)

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सिकंदरला महेश गायकवाडने बाहेरची टांग हा डाव टाकला आणि सामना पलटला. या डावामुळे महेश गायकवाडला 4 गुण मिळाले. या गुणांनंतर महेशने जी आघाडी घेतली ती त्याने शेवटच्या क्षणापर्यंत ठेवली. नियमानुसार पैलवानाने डाव टाकल्यावर विरोधी मल्ल गुडघे न टेकता सरळ जमिनीवर पडला तेव्हा ती एक्शन 4 पाॅईंटची होते. 

हमालाचा पोरगा ते कुस्तीतला सिकंदरने आतापर्यंत केलेल्या खडतर प्रवासामुळे त्याची नाव राज्यभर चर्चेत होतं. उत्तर भारतामधील नामवंत पैलवानांना पराभवाची धूळ चारणारा सिकंदर यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदारप मानला जात होता. सेमी फायनलमध्ये त्याचा अवघ्या एका गुणामुळे पराभव झाला. 

कुस्ती सुरू झाल्यावर महेंद्र गायकवाडला पहिला गुण मिळाला, पहिली फेरी संपायला 10 सेकंद बाकी असताना सिकंदरने दोन गुणांची कमाई केली. पहिल्याफेरीअखेर सिकंदर 2 गुण आणि महेंद्र गायकवाड 1 गुण झाला होता. दुसरी फेरी चालू झाली तेव्हा सिकंदरने आक्रमक पवित्रा घेतला आणि महेंद्रला बाहेर ढकलत आणखी एका गुणाची कमाई केली. दोघेही आपली वर्षेभर केलेली मेहनत पणाला लावत होते. डाव प्रतिडाव झाले तितक्यात चलाखीने महेंद्रने बाहेरची टांग डावच टाकत भरघोस 4 गुणांची कमाई केली.

दरम्यान, महेशच्या एका डावाने तो थेट फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र शिवराज राक्षेने त्याला दोन मिनिट आणि आठ सेकंदात आस्मान दाखवलं. शिवराज महाराष्ट्र केसरी झाला मात्र सिकंदरच्या पराभवची खंत साऱ्यांच्या मनात राहिली. सिकंदरने बाला रफिक शेख या मल्लाला अवघ्या 40 सेकंदात आस्मान दाखवलं होतं. त्यामुळे सिकंदरकडून सर्वांना महाराष्ट्र केसरी होण्याची अपेक्षा होती. 

2023-01-16T12:00:35Z dg43tfdfdgfd