TEAM INDIA COACH : रिकी पॉन्टिंगने भारताचे प्रशिक्षकपद का नाकारलं, समोर आलं एकमेव कारण

नवी दिल्ली : भारताला टी-२० वर्ल्ड कपनंतर आता नवीन प्रशिक्षक मिळणार आहे. भारताच्या प्रशिक्षकपदासाठी रिकी पॉन्टिंगही शर्यतीमध्ये होता. पण पॉन्टिंगने फक्त एका कारणामुळे भारताचे प्रशिक्षकपद नाकारले आहे.

भारताला २०११ नंतर एकही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. भारतीय संघ गेल्या वर्षी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. पण त्यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या विजयात पॉन्टिंगचा मोठा वाटा असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे पॉन्टिंग जर भारताचा प्रशिक्षक झाला तर भारताला त्याचा फायदा होईल, अशी बीसीसीआयची धारणा होती. त्याचबरोबर पॉन्टिंग हा ऑस्ट्रेलियाचा यशस्वी कर्णधार होता. पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने सलगतीन वेळा वर्ल्ड कप जिंकले होते. त्यामुळे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीचे दडपण त्याला योग्यप्रकारे हाताळता येते, हे सर्वांनी पाहिले होते. त्यामुळे पॉन्टिंगचा विचार बीसीसीआय प्रशिक्षकपदासाठी करत होती. पण आता पॉन्टिंगने या गोष्टीला नकार दिला आहे.

पॉन्टिंग म्हणाला की, " मी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक आहे. त्यामुले माझ्यासोबत गेल्या दोन महिन्यांपासून माझे कुटुंबही भारतात आले आहे. माझ्या मुलाला भारत फार आवडला. जेव्हा मी त्याला भारताच्या प्रशिक्षपदाबाबत सांगितले तेव्हा त्याने मला या पदासाठी होकार द्ययला सांगितला. कारण त्याला भारतमध्ये जास्त काळ राहता येऊ शकते. पण मला विचाराल तर भारताचे प्रशिक्षकपद मला भूषवायचे नाही. कारण सध्याच्या घडीला काही गोष्टी बदलल्या आहेत. भारताचे प्रशिक्षकपद स्विकारले तर मला १०-११ महिने संघाबरोबर राहावे लागेल. त्यामुळे मला घरी लक्ष देता येणार नाही. सध्याच्या घडीला माझी मुलं मोठी होत आहेत आणि त्यामुळे कुटंब हे माझे प्राधान्य आहे. त्यामुळे मला घराबाहेर १०-११ महिने राहता येणार नाही आणि हेच एकमेव कारण भारताचे प्रशिक्षकपद नाकारण्याचे आहे."

रिकी पॉन्टिंग हा कर्णधार म्हणून महान होताच, पण प्रशिक्षक म्हणूनही तो चांगली कामगिरी करत आहे. पण तो भारताचे प्रशिक्षकपद का भूषवू शकत नाही, याचे कारण आता समोर आले आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-23T15:37:17Z dg43tfdfdgfd