मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४च्या अंतिम सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सने सन रायझर्स हैदराबाद वर आठ गाडी राखून पराभव केला आणि विजेतेपद आपल्या नावावर केले. अंतिम सामन्यात महत्त्वाची खेळी ही वेंकटेश अय्यरने खेळली आणि कोलकत्ता विजतेपद मिळवून दिले.
या अंतिम सामन्यात वेंकटेशने नाबाद ५२ धावा केल्या तर त्याच्या या कामगिरीचे सगळ्यांनीच कौतुक केले, सामन्यानंतर त्याला विचारण्यात आले होते की तुला कोणता ऑस्ट्रेलियन खेळाडू पसंत आहे, त्याच्यासोबत तेव्हा तिथे मिचेल स्टार्कसुद्धा उभा होता. वेंकेटेशचे उत्तर ऐकताच मिचेल तिथून चालायला लागला.
या हंगामात मिचेलची सुरुवातीची कामगिरी प्रभावशाली नसल्याने त्याला फार ट्रॉल करण्यात आले, तर त्यांनतर एलिसा मात्र भारतात आली आणि मैदानात सामनासुध्दा बघायला आली होती, त्या सामान्यांपासून मिचेलने आपल्या कामगिरीतून सगळ्यांचे तोंड बंद केले. सामन्यानंतर मात्र वेंकटेश आणि मिचेल मुलाखत देत होते तेव्हा मध्येच वेंकेटेशने त्याला गमतीत विचारले कि ''इतके दिवस एलिसाला कुठे लपवून ठेवले होते तू''.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-05-28T11:11:00Z dg43tfdfdgfd