नवी दिल्ली : विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्मात दिसत नसला तरी टॅक्स भरण्याच्या यादीत त्याचा हात कोणीच धरू शकत नाही. कारण रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांना कोहलीने यावेळी मागे टाकले आहे. कारण विराट कोहली हा भारतामधील सर्वाधिक टॅक्स भरणारा खेळाडू ठरला आहे. कोहलीने यावेळी एवढा टॅक्स भरला आहे की, त्याचे उत्पन्न किती असेल, याचा विचार आता चाहते करायला लागले आहेत.
विराट कोहली आयपीएलमध्ये भन्नाट फॉर्मात होता. पण टी २० वर्ल्ड कपमध्ये त्याची बॅट चालली नाही. टी २० वर्ल्ड कपमध्ये तो सातत्याने अपयशी ठरला. त्यानंतर भारताचा संघ हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात तर कोहलीच्या बॅटला गंज लागला आहे की, असेच वाटत होते. कारण कोहलीच्या बॅटमधून धावाच निघत नव्हत्या. कोहली एकाबाजूला धावांचा दुष्काळ अनुभवत असताना दुसरीकडे मात्र कोहलीने भारतामधील सर्व खेळाडूंपेक्षा जास्त टॅक्स भरल्याचे आता समोर आले आहे.
विराट कोहली हा सर्वात महागडा खेळाडू असल्याचे म्हटले जात होते आणि तो आता समोर आले आहे. कारण विराट कोहलीने गेल्या वर्षाच्या आपल्या मानधनावर तब्बल ६६ कोटी रुपयांचा टॅक्स भरल्याचे आता समोर आले आहे. भारतामधील सर्वाधिक टॅक्स भरणारा खेळाडू आता विराट ठरला आहे. विराट कोहली आरसीबीचा स्टार खेळाडू आहे, त्यामुळे आयपीएलमधून त्याची चांगली कमाई होते. त्याचबरोबर बीसीसीआयचा दरवर्षी करार होतो. त्यानंतर एक खेळाडू म्हणून खेळत असताना खेळाडूंना प्रत्येक दिवशी मानधन मिळतं. ही गोष्ट फक्त क्रिकेट संदर्भात आहे. पण क्रिकेट व्यतिरीक्त विराट कोहली ह बऱ्याच जाहीरातींमध्ये दिसतो. तिथूनही विराट कोहलीचा चांगली मिळकत होते. या सर्व गोष्टींमध्ये कोहली भारतामधील सर्व खेळाडूंपेक्षा आता सरस ठरला असल्याचे आता समोर आले आहे.
विराट कोहली हा आपल्या मुलाच्या जन्मानंतर परदेशात राहण्यासाठी गेला होता. त्यामुळे तो यापुढे भारतात राहणार की नाही, यावर जोरदार चर्चा झाली होती. पण जेव्हा सामने असतील तेव्हा तर तो संघात असेल, हे मात्र नक्की.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-09-04T16:04:46Z dg43tfdfdgfd