WPL 2026 कधी सुरू होणार? सर्व सामने लाईव्ह कुठे पाहायचे? जाणून घ्या A टू Z माहिती एका क्लिकवर

When and Where to watch Women Premier League 2026 Live Streaming: महिला प्रीमियर लीग 2026 अर्थात WPL 2026 चा शुभारंभ शुक्रवार, 9 जानेवारीपासून नवी मुंबई येथे होणार आहे. महिला विश्वचषकानंतर सगळ्याचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. स्पर्धेचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळवला जाईल. आतापर्यंत डब्ल्यूपीएलचे तीन सीजन  पार पडले असून मुंबई इंडियन्सने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर एकदा आरसीबी चॅम्पियन ठरली आहे. दिल्ली कॅपिटल्सनेही सातत्यपूर्ण कामगिरी करत तिन्ही सिजनमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. आता यंदा कोण बाजी मारणार हे बघणे मनोरंजक ठरेल. आता चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की WPL 2026 चे सामने लाईव्ह कुठे पाहता येतील? कोणते संघ यंदा खेळणार आहेत. महिला प्रीमियर लीग 2026चा A टू Z माहिती सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

महिला प्रीमियर लीग 2026 कधी सुरू होणार?

महिला प्रीमियर लीग 2026 ची सुरुवात 9 जानेवारीपासून होणार आहे.

हे ही वाचा: WPL 2026: महिला प्रीमियर लीगच्या बक्षिसाची रक्कम किती? विजेत्या संघाला मिळणार 'इतके' कोटी

 

WPL 2026 चा पहिला सामना कोणत्या संघांमध्ये होणार?

महिला प्रीमियर लीग 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळवला जाईल.

WPL 2026 चे सर्व सामने लाईव्ह टीव्हीवर कुठे पाहता येतील?

महिला प्रीमियर लीग 2026 चे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील.

हे ही वाचा: RCB मधील विदेशी खेळाडूंची माघार अन् मराठमोळ्या मुंबईकराचं उघडलं नशीब! WPL 2026 आधी नेमकं काय घडलं?

 

WPL 2026 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

महिला प्रीमियर लीग 2026 मधील सर्व सामने जिओहॉटस्टार अ‍ॅप आणि त्याच्या अधिकृत वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येतील.

महिला प्रीमियर लीग 2026 मध्ये किती संघ सहभागी होणार?

महिला प्रीमियर लीग 2026 मध्ये एकूण पाच संघ सहभागी होणार आहेत. खालीलप्रमाणे त्यांची नावे जाणून घ्या. 

  • मुंबई इंडियन्स
  • दिल्ली कॅपिटल्स
  • रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
  • गुजरात जायंट्स 
  • यूपी वॉरियर्ज

हे ही वाचा: WPL 2026 साठी जेमिमा रोड्रिग्सकडे मोठी जबाबदारी, 'या' संघाची झाली कर्णधार

 

या सिजनमध्ये  एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत. दुपारचे सामने सायंकाळी 3 वाजता सुरू होतील, तर संध्याकाळचे सामने 7:30 वाजता सुरू होतील. एलिमिनेटर आणि अंतिम सामना वडोदरा येथे खेळवला जाणार आहे. महिला प्रीमियर लीग 2026 चा अंतिम सामना 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सर्व संघांनी या हंगामासाठी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे.

 

2026-01-08T04:39:31Z