WRESTLERS PROTEST: कुस्तीपटूंना 1983 च्या जगज्जेत्या क्रिकेटपटूंचा पाठिंबा; कपिल पाजींचा संघ म्हणतोय...

Wrestlers Protest : कुस्तीपंटूंच्या ( Wrestlers Protest ) आंदोलनाला गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. दरम्यान या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला ( Wrestlers Protest ) क्रिकेटर्सने पाठिंबा दिला आहे. 1983 चा वर्ल्डकप ( 1983 Cricket World Cup ) जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट टीमतील अनेक सदस्य कुस्तीपटूंच्या ( Wrestlers Protest ) समर्थनार्थ पुढे आलेत. यामध्ये कपिल देव ( Kapil dev ), सुनील गावस्कर ( Sunil Gavskar ) , बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी ( Roger Binny ) , दिलीप वेंगसरकर याचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर्सवर पाठिंबा न दिल्याने टीका करण्यात येत होत्या. 

भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना सध्या आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलाय. बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्या नेतृत्वाखाली भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग ( Brij Bhushan Sharan Singh ) यांच्या निषेधार्थ मैदानावर उतरलेत.

यावेळी खेळाडूंनी ब्रिजभूषण ( Brij Bhushan Sharan Singh )  यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत याचसोबत कुस्तीपटूंनी त्यांच्या अटकेची मागणी केलीये. अशातच आता भारताला पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकणाऱ्या 1983 च्या जगज्जेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी या कुस्तींपटूंना पाठिंबा दिला आहे.

काय म्हणतेय 1983 ची वर्ल्डकप विजेती टीम?

वर्ल्डकप विजेत्या टीमच्या म्हणण्यानुसार, 'टीमच्या चॅम्पियन कुस्तीपटूंसोबत जे असभ्य वर्तन झालं आहे ते पाहून पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. अनेक वर्षांच्या मेहनत, त्याग आणि संघर्ष करून त्यांनी ही पदकं जिंकली आहेत. ही पदकं हा देशाचा अभिमान आहे. आम्ही या खेळाडूंना आवाहन करतोय की, त्यांनी या प्रकरणी घाई करू नये. त्यांना असलेल्या सर्व समस्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील, अशी आम्ही आशा करतो.

सुनील गावसकर, मोहिंदर अमरनाथ, यशपाल शर्मा, मदन लाल, बलविंदर सिंग संधू, के श्रीकांत, सय्यद किरमणी, संदीप पाटील, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी आणि रवी शास्त्री हे खेळाडू 1983 च्या अंतर्गत वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीममध्ये होते. याच टीममधील खेळाडू आता कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

 

2023-06-02T10:51:01Z dg43tfdfdgfd