मुंबई : भारतीय ट्रान्सजेंडर क्रिकेटर अनाया बांगर चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने अनाया बांगरला महिला क्रिकेमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती. या बातमीची सर्व क्रिकेट वर्तुळात चर्चा झाली. ट्रान्सजेंडर क्रिकेटरला बीसीसीआयकडून महिला क्रिकेटमध्ये खेळण्याबाबत कोणतेही अधिकृत असे धोरण नाही. आयसीसीकडून बंदी आहे असं म्हटलं तरी चालेल पण बीसीसीआयकडून तसा कोणताही नियम नाही. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून अनायाला परवानगी असली तरीसुद्धा टेस्टोस्टेरॉनची मर्यादित पातळीचा नियम लक्षात घ्यावा लागणार आहे. पण ऑस्ट्रेलिया क्रिकेटने अनायाला दिलेल्या परवानगीच्या मुद्द्याचा धागा पकडत दक्षिण आफ्रिकेची महिला स्टार खेळाडू मारिजान कॅप हिने हा निर्णय म्हणजे मूर्खपणा असल्याचं म्हटलं होतं. अनायाला दिलेल्या परवानगीला मारिजान कॅपने जाहीरपणे विरोध केलाय. यावर अनाया बांगरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ताज्या घडामोडींची माहिती मिळवा, तीही कधीही आणि कुठेही. महाराष्ट्र टाइम्स ॲप आत्ताच डाउनलोड करा!
मारिजान कॅपने इन्स्टाग्रामवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या परवानगीला मूर्खपणा असल्याचं म्हटलं असून याला परवानगी दिली नाही पाहिजे असं म्हटलं होतं. मारिजान कॅपची इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. याला अनाया बांगरने उत्तर दिलं असून या विषयाची योग्य माहिती घे, असं म्हटलं आहे. अनाया बांगर उत्तर देताना नेमकं काय म्हणाली जाणून घ्या.जे लोक याच्या विरोधात आवाज उठवत आहेत त्यांनी आधी या विषयाची पूर्ण माहिती घ्यायला हवी. यामुळे कोणताही चुकीचा फायदा मिळत नाही आणि हा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच आहे, तरीही कुणाचं वैयक्तिक मत वेगळं असेल तर त्यांनी स्वतःला शिक्षित केलं पाहिजे, असं अनाया बांगर म्हणाली.
भारताचे माजी क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी आहे. मेडिकल सर्जरी करून मुलापासून मुलगी बनलीय. अनाया बांगर आता क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने जरी परवानगी दिली असली तरी अनायाला काही अटी असणार आहेत. ट्रान्सजेंडर आणि जेंडर डायव्हर्स पॉलिसीनुसार १२ महिने टेस्टोस्टेरॉन पातळी १० nmol/L इतकी ठेवावी लागणार आहे. हे ब्लडद्वारे सिद्ध करणं बंधनकारक असणार आहे. मार्च २०२७ पासून एलिट क्रिकेटसाठी तिला सर्व नियम पूर्ण करावे लागतील.
दरम्यान, अनाया बांगर २५ वर्षांची आहे. जन्म झाला तेव्हा मुलगा म्हणून झाला होता त्यावेळी तिचे नाव आर्यन असे होते. पण मेडिकल केल्यानंतर मुलगी झाली होती. पुढे आर्यनचे अनाया असे नाव ठेवले होते. अनायाच्या रिप्लायवर मारिजान कॅप काय उत्तर देते का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तुमचे नाव तुमच्या प्रगतीच्या आड येत आहे का? – आजच तुमच्यासाठी आदर्श नाव शोधा
महाराष्ट्र टाइम्स सोबत ताज्या बातम्यांशी अपडेट राहा. सिटी न्यूज, इंडिया न्यूज, बिझनेस न्यूज आणि स्पोर्ट्स न्यूज मधील सर्व ट्रेंडिंग आणि ब्रेकिंग बातम्या मिळवा. एंटरटेनमेंट न्यूज, टीव्ही न्यूज आणि लाइफस्टाइल टिप्स साठीही महाराष्ट्र टाइम्स ला भेट द्या.
2026-08-29T11:53:21Z