मुंबईत टीम इंडियाचे दोन्ही कॅप्टन, कोच गंभीर, अजित आगरकरांसह लक्ष्मण यांच्यात बैठक, रोहित शर्मा वर्ल्डकप खेळणार की नाही?
![]()
मुंबई : काही वर्षांतील भारतीय क्रिकेट संघांची कामगिरी अपेक्षित झालेली नाही, या 'पोस्टमॉर्टम 'द्वारे कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आज भारतीय क्रिकेट बोर्डाची (बीसीसीआय) उच्च स्तरीय बैठक आज, गुरुवारी होणार आहे.
ताज्या घडामोडींची माहिती मिळवा, तीही कधीही आणि कुठेही. महाराष्ट्र टाइम्स ॲप आत्ताच डाउनलोड करा!
मुंबईत होणार आढावा बैठक
मुंबईत होणाऱ्या या आढावा बैठकीसाठी मुख्य प्रशिक्षक
गौतम गंभीर, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हेही खास निमंत्रित आहेत.
भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी मालिका; तसेच स्पर्धांसाठी रोडमॅप तयार करण्यासाठी ही बैठक होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र. त्यात प्रामुख्याने भारतीय संघाच्या कामगिरीचे सखोल विश्लेषण होणार आहे. त्यामुळेच कसोटी आणि वन-डे संवाचा कर्णधार शुभमन गिल आणि टी-२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर यांनाही या बैठकीसाठी निमंत्रित केले असल्याचे बीसीसीआयमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यातील अपयशानंतर तातडीने ही बैठक घेण्याचे बीसीसीआयने ठरवले होते. मात्र, श्रीलंका दौऱ्यानंतरच एकत्रित आढावा घेण्याचे ठरले. वर्ल्ड कप टी-२० विजेता भारतीय संघाने आयर्लंडमध्ये दोन्ही टी-२० सामने गमावले. त्याच वेळी इंग्लंडमध्ये ०-४ अशी हार पत्करावी लागली. त्यानंतर वन-डे मालिकेतही भारतीय संघ १-२ असा पराभूत झाला. मात्र, इंग्लंड, आयर्लंडविरुद्धच्याच नव्हे तर झिम्बाब्वे तसेच श्रीलंकेविरुद्धच्या आढावा घेण्यात येईल. कामगिरीचाही या बैठकीस सुरुवातीस केवळ भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव देवजित सैकिया हेच उपस्थित राहतील असे सांगितले जात होते. मात्र आता अध्यक्ष मिथुन मिन्हास यांच्यासह कार्यकारिणीतील वरिष्ठ सदस्यही उपस्थित राहतील अशी चिन्हे आहेत.
भारतीय दौऱ्याचा कार्यक्रम
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा, भारत अ संघाचे दौरे तसेच राष्ट्रीय संघाचा कार्यक्रम यात समन्वय आणण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेपूर्वी भारत अ संघ तिथे सामने खेळणार आहे. मात्र या लढती असताना भारताचा वरिष्ठ संघ मर्यादित षटकांच्या लढती खेळणार आहे.
खेळाडूंच्या दुखापतीचा प्रश्न
सेंटर फॉर एक्सलन्सच्या वैद्यकीय अहवालावरूनही संघव्यवस्थापना नाराज आहे. बेंगळुरूच्या या केंद्रामुळे हा प्रश्न निकालात निघेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात खेळाडूंची संख्या सातत्याने वाढत आहे.
रोहित कळीचा मुद्दा
भारतीय क्रिकेट बोर्डाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात रोहित शर्माच्या वनडे संघातील समावेशावरून सुप्त संघर्ष सुरू आहे. आगरकर यांचा रोहितला असलेला विरोध भारतीय बोर्डास मान्य नाही. त्यामुळे आता आगरकर यांना दूर करण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेत दिले जात आहेत. रोहितचे तसेच आगरकर यांचे भवितव्य याबाबत दीर्घ चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय निवड समिती देशांतर्गत सामन्यांना उपस्थित राहण्याऐवजी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या उपस्थितीस प्राधान्य देते हाही कळीचा मुद्दा आहे.
तुमचे नाव तुमच्या प्रगतीच्या आड येत आहे का? – आजच तुमच्यासाठी आदर्श नाव शोधा
महाराष्ट्र टाइम्स सोबत ताज्या बातम्यांशी अपडेट राहा. सिटी न्यूज, इंडिया न्यूज, बिझनेस न्यूज आणि स्पोर्ट्स न्यूज मधील सर्व ट्रेंडिंग आणि ब्रेकिंग बातम्या मिळवा. एंटरटेनमेंट न्यूज, टीव्ही न्यूज आणि लाइफस्टाइल टिप्स साठीही महाराष्ट्र टाइम्स ला भेट द्या.
2026-09-03T04:53:22Z