वैभव सूर्यवंशी काही तासात खेळणार सेमीफायनल, येथे पाहता येणार सामन्याची LIVE STREAMING

Duleep trophy Semi-Final : दुलीप ट्रॅाफी 2026 ची ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे, आता सेमीफायनलचे सामने 30 ऑगस्टपासून खेळवले जाणार आहेत. सेंट्रल झोन विरुद्ध इस्ट झोन आणि साऊथ झोन विरुद्ध नॅार्थ झोन यांच्यामध्ये हे उपांत्य फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत. वैभव सूर्यवंशी संघासाठी उद्या सेमीफायनलचा सामना खेळणार आहे, बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांची सविस्तर माहिती तुम्हाला या लेखामध्ये देणार आहोत. वैभव सूर्यवंशी आणि रजत पाटीदार सेमीफायनलमध्ये आमनेसामने येणार आहेत. आता हा सामना कधी आणि कुठे होणार यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा. 

सेंट्रल झोनने गेल्या वर्षीची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघातील प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले आहे. आयपीएल आणि एमपी टी20 लीगमध्ये प्रभावी कामगिरीच्या जोरावर पाटीदार या स्पर्धेत उतरत आहे, तर उपकर्णधार रिंकू सिंग हा मधल्या फळीतील आणखी एक मजबूत खेळाडू आहे. सेंट्रल झोनची ताकद त्यांची गोलंदाजी असू शकते. वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर या सामन्यात क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे. वैभव सूर्यवंशीची आतापर्यत बॅट शांत राहिली आहे पण गोलंदाजीने त्याने उप-उपांत्य फेरीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 

कधी आणि कुठे पाहता येणार?

दुलीप ट्रॅाफीचा सेमीफायनल 1 चा सामना हा बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (राष्ट्रीय क्रिकेट अकादमी) येथे खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण सेमीफायनलमध्ये विजय मिळवणारा संघ हा फायनलमध्ये स्थान मिळवेल. हा सामना भारतीय वेळेनुसार 30 ऑगस्ट रोजी 9.30 मिनिटांनी सुरु होणार आहे. या सामन्याचे नाणेफेक 9.00 वाजता होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही जिओहॅाटस्टारवर पाहायला मिळणार आहे. 

 

2026-08-29T12:24:32Z