मुंबई : क्रिकेटमधील एखाद्या सामन्यात बॉलिंग किंवा बॅटिंगमुळे एखादा खेळाडू हा लक्षात राहतो पण काही खेळाडू अपवाद असतात. ते फक्त फील्डिंगवरूनच आपली छाप पाडतात. आताच्या मॉर्डन क्रिकेटमध्येही एका असाच खेळाडू आहे, ज्याची चर्चा ही फक्त फील्डिंगवरून झालेली पाहायला मिळते. न्यूझीलंड संघाचा खेळाडू ग्लेन फिलिप्स याने क्रिकेट विश्वाला अनेक अनपेक्षित असे कॅच पकडून दाखवत थक्क केले आहे. हवेत उडी मारत किंवा उजव्या नाहीतर डाव्या बाजूला डाय मारत फिलिप्सने कॅचेस घेतलेत. पण आता एक नवीनच कॅच त्याने घेतला असून मॅगनेटसारखा चेंडू हातात बसला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कॅरेबियन लीगमधील सामन्यात फिलिप्सने हा कॅच घेतला आहे.
ताज्या घडामोडींची माहिती मिळवा, तीही कधीही आणि कुठेही. महाराष्ट्र टाइम्स ॲप आत्ताच डाउनलोड करा!
गयानाचा वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियस याच्या शॉर्ट बॉलवर सुनील नरेन याने लेग साइडला चेंडू हवेत टोलावला, वाऱ्याच्या गतीने चेंडू सीमीरेषेच्या दिशेने जात होता. सर्वांना सुरूवातीला वाटलं की षटकार जाईल, परंतु तिथे एखाद्या बलाढ्या भिंतीप्रमाणे ग्लेन फिलिप्स हा उभा होता. वाऱ्याच्या वेगाने जात असलेल्या चेंडूला त्याने सीमारेषेवर संतुलन साधलं आणि एका हाताने कॅच पकडला. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. अचूक वेळ साधत त्याने कशाप्रकारे कॅच पकडला.कॅरेबियन लीगमध्ये हा सामना गयाना अमेजन वॉरियर्स वि. ट्रिनबागो नाइट रायडर्स यांच्यात पार पडला. पावसामुळे खेळ थांबवला गेला होता, जवळपास ९० मिनिटे सामना थांबवावा लाला, त्यानंतर मात्र हेटमायर याने याने सूत्र आपल्या हातात घेत ४० चेंडूत तुफनी अर्धशथत केले. पहिल्यांदा फलंदाजी करतान गयाना संघाने १६ ओव्हरमध्ये १६५ धावा केल्या होत्या.पण या सामन्यात डकवर्थ लुइस नियमामुसार ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाला १८२ धावांचे टार्गेट मिळाले होते.
१८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाची खराब सुरूवात झाली. सुनील नरेन याने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फिलिप्सच्या अफलातून कॅचमुळे त्याला माघारी जावं लागलं. नरेन स्वस्तात परतल्यावर ट्रिनबागो संघ दबावात आलेला दिसला. निकोलस पूरन याने आक्रमण केले परंतु मोहम्मद नबी याने पूरनसह इतर महत्त्वाच्या फलंदाजांनाही तंबूचा रस्ता दाखवला. ट्रिनबागोची ६८-५ अशी खराब अवस्था झाली होती. अकील हुसेन आणि एलेक्स हेल्स यांनी ४३ धावांची भागीदारी केली होती. २३ चेंडूत हेल्सने आपले अर्धशतक पूर्ण केले, जोशुआ डिसिल्वा यांनी मोठे फटके मारले पण शेवटी अवघ्या ९ धावांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यामध्ये फिलिप्सचा कॅच मात्र सर्वांच्या लक्षात राहिला.
तुमचे नाव तुमच्या प्रगतीच्या आड येत आहे का? – आजच तुमच्यासाठी आदर्श नाव शोधा
महाराष्ट्र टाइम्स सोबत ताज्या बातम्यांशी अपडेट राहा. सिटी न्यूज, इंडिया न्यूज, बिझनेस न्यूज आणि स्पोर्ट्स न्यूज मधील सर्व ट्रेंडिंग आणि ब्रेकिंग बातम्या मिळवा. एंटरटेनमेंट न्यूज, टीव्ही न्यूज आणि लाइफस्टाइल टिप्स साठीही महाराष्ट्र टाइम्स ला भेट द्या.
2026-09-01T11:38:22Z