Lionel Messi’s emotional goodbye leaves the entire World in shock: फुटबॉल विश्वातून एक अत्यंत मोठी आणि भावुक करणारी बातमी समोर आली आहे. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू आणि कॅप्टन लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 2026 च्या वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये स्पेनविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आणि नुकतेच वडिलांचे निधन झाल्यामुळे मेस्सीने हा अत्यंत कठीण निर्णय घेतला आहे. वयाच्या 39 व्या वर्षी, तब्बल 20 वर्षांच्या ऐतिहासिक आणि विक्रमी कारकिर्दीला त्याने पूर्णविराम दिला आहे.
आपल्या निरोप संदेशात मेस्सी म्हणाला, "फायनलपासूनचा हा काळ खूप विचारांत गेला. आता मी सर्वांना सांगू इच्छितो की मी राष्ट्रीय टीममधून निवृत्ती घेत आहे. हा निर्णय माझ्या मनाला आणि आतून मला तोडणारा आहे, याचे मला आजही खूप दुःख होते; पण मला ठाऊक आहे की, आता हीच योग्य वेळ आहे. मी शपथ घेतो की या जर्सीसाठी मी नेहमीच माझे सर्वस्व दिले, जेणेकरून तुम्हाला आनंद देता येईल आणि अर्जेंटिनाकडून खेळतानाचा अभिमान वाटेल."
टीममधील तरुण प्लेअर्सबद्दल बोलताना मेस्सी म्हणाला की, आता नॅशनल टीममध्ये अनेक प्रतिभावान आणि अप्रतिम तरुण प्लेअर्स पुढे येत आहेत, जे या स्थानावर खेळण्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत. "माझ्याकडे आता टीमला देण्यासाठी आणखी काही उरलेले नाही. गेल्या 20 वर्षांत मिळालेल्या अफाट प्रेमासाठी मी चाहत्यांचा आभारी आहे. स्टेडियममध्ये घुमणारे तुमचे आवाज मला नक्कीच आठवतील. आता मी एका चाहत्याच्या भूमिकेतून टीमचा नेहमीच बाहेरून पाठिंबा देईन," अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
हे पण वाचा : महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल 2 कोटी नावं वगळली; तुमचं नाव आहे का? SIR ची ड्राफ्ट लिस्ट जाहीर