क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, भारतामध्ये 2027 मध्ये पहिल्यांदाच आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॅाफीचे आयोजन करणार आहे. आता आयसीसीने स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या आहेत, ही स्पर्धा कधी होणार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. ही स्पर्धा मूळतः श्रीलंकेत होणार होती, परंतु श्रीलंकेच्या क्रिकेटमधील राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने ती भारतात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील अग्रगण्य क्रिकेट संस्थेने स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाणे जाहीर केले आहेत. ही स्पर्धा श्रीलंकेमध्ये होणार होत्या पण श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने या स्पर्धा भारतामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतामध्ये 2027 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॅाफीचे आयोजन केले जाणार आहे, ही स्पर्धा ऐतिहासिक ठरणार आहे. कारण ही स्पर्धा भारतामध्ये पहिल्यांदाच खेळवली जाणार आहे, या स्पर्धेमध्ये एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. एकदिवसीय विश्वचषकानंतर मायदेशात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची भारतीय संघाला एक महत्त्वपूर्ण संधी मिळेल. यापूर्वीच्या माध्यमांतील वृत्तांनुसार, आयसीसी ही स्पर्धा दुसऱ्या देशात हलवण्याचा विचार करत असल्याचा दावा करण्यात आला होता, आणि आता याला अधिकृतपणे दुजोरा देण्यात आला आहे. आता ही स्पर्धा भारतामध्ये कोणत्या मैदानावर खेळवली जाणार आहे याची देखील घोषणा होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ही अधिकृत घोषणा केली आहे. ही विशेष स्पर्धा 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2027 दरम्यान खेळवली जाईल. या स्पर्धेतील सर्व सामने भारतातील दोन सुंदर क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. यामध्ये पहिले मैदान हे मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (ब्रेबॉर्न स्टेडियम) आहे आणि तर दुसरे मैदान हे वडोदरामधील वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
हे ही वाचा
आयसीसी चॅम्पियन ट्रॅाफी 2027 ची स्पर्धा सुरुवातीला श्रीलंकेत आयोजित करण्याचे ठरले होते. तथापि, श्रीलंकन क्रिकेट बोर्ड (SLC) मध्ये सुरू असलेल्या प्रशासकीय सुधारणांमुळे, आयसीसीने स्थळ बदलण्याचा निर्णय घेतला. आयसीसीने यजमानपदासाठी भारत, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्याकडून आलेल्या बोलींचे मूल्यांकन केले, ज्यात भारत विजयी ठरला आणि २ सप्टेंबर रोजी आयसीसी बोर्डाने भारताच्या बोलीला मंजुरी दिली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे 2027 मध्ये आयोजित होणाऱ्या पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचा आराखडा पूर्ण झाला आहे. या स्पर्धेत जगातील अव्वल सहा संघ सहभागी होतील: भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका.
2026-09-02T16:09:32Z