KHATRON KE KHILADI 14: गश्मीर महाजनी, कृष्णा श्रॉफला हरवत करणवीर मेहराने जिंकला शो

Khatron Ke Khiladi 14 Winner: स्टंट आधारित रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी १४’ ची मागील काही महिने खूप चर्चा होती. रोहित शेट्टीने दिलेले कठीण टास्क, स्पर्धकांना स्टंट करताना आलेल्या अडचणी, एकमेकांशी भांडणं यानंतर अखेर रविवारी (२९ सप्टेंबर रोजी) शोचा ग्रँड फिनाले पार पडला. करणवीर मेहरा १४ व्या पर्वाचा विजेता ठरला.

फिनाले एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि वेदांग रैना त्यांच्या ‘जिगरा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते, त्यांनी सर्व स्पर्धकांबरोबर खूप धमाल केली. करणवीर मेहरा, मराठी अभिनेता गश्मीर महाजनी व टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ ‘खतरों के खिलाडी १४’ चे टॉप तीन स्पर्धक होते, यापैकी करणवीर विजेता ठरला असून त्याचे ट्रॉफीबरोबरचे फोटो व्हायरल होत आहेत.

ट्रॉफीसह मिळाली कार

करणवीर मेहरा हा टॉप ३ मध्ये स्थान मिळवणारा पहिला स्पर्धक होता. यानंतर कृष्णा श्रॉफने फिनाले गाठला आणि त्यानंतर गश्मीर फिनालेमध्ये पोहोचला. त्यानंतर या तिघांमध्ये फिनाले स्टंट खेळला गेला. करणवीरने गश्मीर आणि कृष्णा यांना हरवून शोची ट्रॉफी जिंकली. करणवीर मेहराला ‘खतरों के खिलाडी १४’ च्या ट्रॉफीसह एक कारही मिळाली.

2024-09-30T02:54:32Z dg43tfdfdgfd