WTC POINTS TABLE: श्रीलंकेमुळे ऑस्ट्रेलियाचा WTC अंतिम फेरीचा मार्ग खडतर; कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघावर मिळवला एकतर्फी विजय

Sri Lanka Beat New Zealand by 154 Runs and an Innings SL vs NZ 2nd Test: श्रीलंका वि न्यूझीलंड कसोटी मालिकेत श्रीलंकेच्या संघाने मोठी बाजी मारली आहे. श्रीलंकेच्या संघाने मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करून दमदार कामगिरी केली. श्रीलंकेने २ कसोटी सामन्यांची मालिका एकतर्फी जिंकल्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. श्रीलंकेच्या विजयाने आता ऑस्ट्रेलियावरील दडपण वाढवले आहे.

गॉल येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने एक डाव आणि १५४ धावांनी सामना जिंकला. या विजयासह श्रीलंकेच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले आहे आणि अंतिम फेरी गाठण्याच्या शर्यतीतही त्यांचा समावेश झाला आहे.

श्रीलंका संघ आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्याच्या गुणांची टक्केवारी ५५.५५ आहे, तर श्रीलंका आता दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघापेक्षा थोडा मागे आहे. ऑस्ट्रेलियन संघाने मिळवलेल्या गुणांची टक्केवारी ६२.५ आहे.

2024-09-29T08:39:13Z dg43tfdfdgfd