अखेर सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम मोडलाच, विराट कोहलीने रचला इतिहास...

Ind vs Bng 2nd Test : कानपूर कसोटी सामन्यात टीम इंडियाने (Team India) 285 धावात 9 विकेट गमावत पहिला डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान शंभर धावा करण्याचा विक्रम या सामन्यात टीम इंडियाने रचला. त्याचबरोबर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही (Virat Kohli) कानपूर कसोटीमध्ये (Ind vs Ban Kanpur Test) एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीने 35 धावा करताच एक असा विक्रम रचला, ज्याबाबत दिग्गज खेळाडू स्वप्नही बघत नसतील. विराटने कानपूर कसोटीत 35 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27000 धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली हा क्रिकेट जगतातला चौथा फलंदाज ठरला आहे. पण सर्वात वेगवान 27 हजार करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पॉन्टिंग, संगकाराही याबाबतीत विराटच्या मागे आहेत.

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 27 हजार धावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 27 धावा करण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर झावा आहे. अवघ्या 594 डावात विराटने ही कामगिरी केली आहे. 27 हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी सचिन तेंडुलकरला 623 डाव खेळावे लागले होते. तर कुमार संगकाराने 648 आणि रिकी पॉण्टिंगने 650 डावात ही कामगिरी केली होती. विराट आता या तिन दिग्गजांच्याही पुढे गेला आहे.

विराट कोहलीची आकडेवारी

- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 27 हजार धावा करण्याऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आता अव्वल क्रमांकावर आहे.

- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 15 धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्याच नावावर आहे. हा विक्रम त्याने 333 डावात केला होता.

- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 20 हजार धावा करणारा खेळाडूही विराट कोहलीच आहे. त्याने 417 डावात हा विक्रम रचला.

विराट कोहलीचं अर्धशतक हुकलं

विराट कोहलीने 27 हजार धावांचा टप्पा पार केला, पण कानपूर कसोटीत अर्धशतकापासून मात्र तो हुकला. विराटने 35 चेंडूत 47 धावा केल्या. शाकिब अल हसनने विराटची विकेट घेतली. विराट कोहली यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एकच अर्धशतक करु शकलाय. आपल्या खेळीत विराटने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला.

2024-09-30T12:27:50Z dg43tfdfdgfd