क्रिकेट फॅन्ससाठी ब्लॉकबस्टर ऑक्टोबर, वर्ल्ड कप खेळणार टीम इंडिया, पाकिस्तानसोबत होणार मुकाबला

Team India Schedule : भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी ऑक्टोबरच महिना हा ब्लॉकबस्टर राहणार आहे. या महिन्यात पुरुष आणि महिला संघाचे सामने रंगणार असून यात भारताची महिला क्रिकेट संघ आयसीसी टी 20 वर्ल्ड कप खेळणार आहे तर पुरुषांचा संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्ध सीरिज खेळेल. 

टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यावर नजर : 

भारताचा पुरुष संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात जुलै महिन्यात आयसीसी मेन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकला होता. तर आता ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या वूमन्स टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यावर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाची नजर असेल. वूमन्स टी 20 वर्ल्ड कपच्या 8 सीजनमध्ये भारत आतापर्यंत केवळ एकदाच फायनल खेळला आहे. 2020 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. तर 2023 च्या सेमी फायनलमध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला होता. 

न्यूझीलंड सोबत पहिला सामना मग पाकिस्तानशी टक्कर : 

3 ऑक्टोबर पासून आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार असून यात टीम इंडियाचा पहिला सामना 4 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध होईल. हा मुकाबला दुबईत खेळवला जाणार असून त्यानंतर 6 तारखेला भारत - पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. या सामन्याची भारतीय फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय महिला संघ हा ऑक्टोबरमध्ये फक्त वर्ल्ड कपचे सामने खेळेल. आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल 17 आणि 18 ऑक्टोबरला होणार असून वर्ल्ड कप फायनल 20 ऑक्टोबरला होईल. 

हेही वाचा : विराटची बॅट हाती पडताच आकाश दीप बनला 'हिमॅन' चेंडू थेट स्टेडिअमबाहेर, कोहलीही हैराण

 

टीम इंडियाच्या पुरुष संघाचा न्यूझीलंडशी सामना : 

भारतीय पुरुष संघाबद्दल बोलायचे झाल्यास ऑक्टोबरमध्ये ते बांगलादेश विरुद्ध दोन सामान्यांची टी 20 सीरिज खेळतील. 6 आणि 9 ऑक्टोबर रोजी हे सामने पार पडतील. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळेल. यातील पहिला टेस्ट सामना हा 16 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. 

ऑक्टोबर महिन्यात भारतीय पुरुष संघाचं शेड्युल :

तारीख विरुद्ध सामना ठिकाण वेळ
6 ऑक्टोबर बांगलादेश पहिला टी20 ग्वालियर 7:00 PM
9 ऑक्टोबर बांगलादेश दूसरा टी20 दिल्ली 7:00 PM
12 ऑक्टोबर बांगलादेश तीसरा टी20 हैदराबाद 7:00 PM
16-20 ऑक्टोबर न्यूझीलंड पहिली टेस्ट बेंगलुरु 9:30 AM
24-28 ऑक्टोबर न्यूझीलंड दूसरी टेस्ट पुणे 9:30 AM

ऑक्टोबर महिन्यात भारतीय महिला संघाचं शेड्युल :

तारीख विरुद्ध सामना ठिकाण वेळ 
4 ऑक्टोबर न्यूझीलंड वर्ल्ड कप दुबई 7:30 PM
6 ऑक्टोबर पाकिस्तान वर्ल्ड कप दुबई 3:30 PM
9 ऑक्टोबर श्रीलंका वर्ल्ड कप दुबई 7:30 PM
13 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप शारजाह 7:30 PM
 

2024-10-01T06:13:11Z dg43tfdfdgfd