India vs Bangladesh : कानपूरच्या ग्रीन पार्कवर सध्या टेस्ट क्रिकेटमध्ये टी-ट्वेंटीची झलक पहायला मिळतीये. पावसामुळे दोन दिवस वाया गेल्याने टीम इंडियाने फलंदाजी करताना घेर बदलले अन् आक्रमक शैलीत फलंदाजी सुरू केलीये. बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने चार विकेट्स गमावून 246 धावा केल्या आहेत. अशातच या सामन्यात टीम इंडियाच्या किंग कोहलीने क्रिकेटच्या देवाचा रेकॉर्ड मोडून काढलाय.सचिनचा विक्रम मोडीतवयाच्या 35 व्या वर्षी विराट कोहली मैदान गाजवतोय. विराट कोहली याने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात 35 बॉलमध्ये 47 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने चार फोर अन् एक सिक्स लगावला. विराटची फिफ्टी जरी हुकली असली तरी देखील विराटने या इनिंगमध्ये सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडला. सचिन तेंडूलकरने 623 इनिंगमध्ये 27 हजार धावांचा टप्पा पार केला होता. आता विराटने केवळ 594 इनिंगमध्ये 27 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा विराट चौथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.Another day at office, another milestone breached!@imVkohli now has 27000 runs in international cricket He is the fourth player and second Indian to achieve this feat!#INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ijXWfi5v7O— BCCI (@BCCI) September 30, 2024विराटसाठी क्राऊडचा कल्लाविराट कोहली फलंदाजी करत असताना कानपूरच्या स्टेडियमवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी विराटची फिरकी घेतली. दस रुपये की पेस्सी विराट भाई से**, असं प्रेक्षकांनी नाराच लगावला. ऋषभच्या एका चुकीमुळे विराट कोहली बाद झाला असता पण विराटचं नशिब चांगलं होतं म्हणून समोर दिसणारी विकेट बांगलादेशला घेता आली नाही.बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शदमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद आणि खालेद अहमद.टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
2024-09-30T10:54:04Z dg43tfdfdgfd