IND VS BAN 2nd Test 4th Day : भारत विरुद्ध बांगलादेश (India VS Bangladesh) यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जातं आहे. या सीरिजमधील दुसरा टेस्ट सामना हा कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळवला जात असून सोमवारी या सीरिजचा चौथा दिवस होता. चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी बांगलादेशच्या खेळाडूंचा घाम काढला. टीम इंडियाने टेस्ट क्रिकेटमध्ये नवनवीन रेकॉर्डस् नावावर केले.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टेस्ट सामना 27 सप्टेंबर पासून कानपुर येथे खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु पहिल्याच दिवशी पावसाच्या आगमनामुळे केवळ 35 ओव्हर खेळवण्यात आल्या. यात भारताने बांग्लादेशच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या आणि बांगलादेशने 107 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याही दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने खेळ एकही बॉल न खेळवता रद्द झाला तर तिसऱ्या दिवशी मैदान ओलसर असल्याने खेळ रद्द करण्यात आला.
चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने खेळ सुरु करण्यात आला. यावेळी बांगलादेशची टीम फलंदाजी करताना टीम इंडियाने त्यांना 233 धावांवर रोखले. यावेळी जसप्रीत बुमराहने बांगलादेशच्या सर्वाधिक 3, मोहम्मद सिराज, आर अश्विन, आकाश दीप यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर जडेजाने एक विकेट घेतली. टीम इंडियाने फलंदाजी करताना बांगलादेशची आघडी मोडीत काढून 285 धावा केल्या. यादरम्यान टीम इंडियाने अनेक रेकॉर्डस् केले. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माची टीम मैदानात आली. यावेळी त्यांनी टेस्टमधील सर्वात जलद 50 धावा केल्या. पुढे येणाऱ्या फलंदाजांनी हाच फॉर्म कायम ठेवत टेस्ट क्रिकेटमधील सर्वात जलद 100, 150, 200 आणि 250 धावा केल्या. टीम इंडियाने अवघ्या 10.1 ओव्हरमध्ये 100 धावापूर्ण केल्या होत्या.
हेही वाचा : विराटची बॅट हाती पडताच आकाश दीप बनला 'हिमॅन' चेंडू थेट स्टेडिअमबाहेर, कोहलीही हैराण
टीम इंडियाकडून पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक 72 धावा या यशस्वी जयस्वालने केल्या. रोहितने 23, शुभमनने 39, कोहलीने 47, राहुलने 68 तर आकाश दीपने 12 धावा केल्या. टीम इंडियाने बांगलादेशची आघडी मोडीत काढून 285 धावा केल्या. परंतु 9 विकेट्स गेल्यावर रोहितने फलंदाजांना बोलावून घेतले त्यामुळे 285 धावांवर खेळ आटोपला. यावेळी भारताने अवघ्या 52 धावांची आघाडी घेतली होती तर चौथ्या दिवसाअंती बांगलादेशने पुन्हा फलंदाजी करताना 2 विकेट्स गमावून 26 धावा केल्या.
यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज
शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार ), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद
2024-09-30T13:42:55Z dg43tfdfdgfd