दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं बांगलादेशचा पार धुव्वा उडवला. खरं तर पावसामुळे या मॅचचे ३ दिवस वाया गेले होते. पण तरी देखील भारतीय संघानं हार मानली नाही. केवळ दिड दिवसांत दोन वेळ बांगलादेशचा ऑलआऊट करून जवळपास ड्रॉ झालेली मॅच जिंकली. दरम्यान टेस्टमध्ये भारताचा T-20 खेळ पाहून पाकिस्तानी लोकं शॉक्ड झाली आहेत.
पाकिस्तानचे काही माजी खेळाडू टीम इंडियाचं कौतुक करताहेत, तर काही जणं बांगलादेशवर जोरदार टीका करताहेत. म्हणताहेत, बांगलादेश खराब खेळली म्हणून भारत जिंकला. त्यांना तर धड एक दिवस बॅटिंग कर
ता आली नाही. चला पाहूया पाकिस्तानी मीडियाचे काही व्हायरल होणारे व्हिडीओ.
(फोटो सौजन्य - VANDE INDIA NEWS/YouTube)
१५ ओव्हरमध्ये उडाला बांगलादेशचा धुव्वा
या मॅचमध्ये भारतानं पहिली बॉलिंग करून बांगलादेशला २३३ धावांवर रोखलं आणि मग अवघ्या ३५ ओव्हरमध्ये हे आव्हान पुर्ण करून वर ५० धावांची लीड सुद्धा दिली. परिणामी बांगलादेशला पुन्हा बॅटिंगसाठी यावं लागलं. दरम्यान या मॅचमध्ये नेमकं घडतेय काय? हे लक्षात येण्याआधीच ते पुन्हा एकदा १४६ धावांवर ऑलआऊट झाले. परिणामी भारताला जिंकण्यासाठी फक्त ९५ धावांचं आव्हान उरलं. अन् हे आव्हान टीम इंडियानं फक्त १७ ओव्हरमध्येच पूर्ण करून मालिका खिशात टाकली. टीम इंडियानं भारतात जिंकलेली ही सलग १८ वी मालिका आहे त्यामुळे क्रिकेट फॅन्स प्रचंड खुश आहेत.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-10-01T11:21:39Z dg43tfdfdgfd