Shahrukh Khan on MS Dhoni IPL: बीसीसीआयने आयपीएल 2025 साठी रिटेंशनच्या नियमांची घोषणा केली आहे. लिलावापूर्वी प्रत्येक संघाला जास्तीत जास्त सहा खेळाडू राखून ठेवण्याची परवानगी दिली जाईल, परंतु चेन्नई सुपर किंग्जसाठी अनकॅप्ड खेळाडू नियम जास्त महत्वाचा आहे. गेल्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या कोणत्याही भारतीय खेळाडूला 'अनकॅप्ड प्लेअर' मानलं जाईल असा नियम असून, त्यात माजी कर्णधार धोनीचाही समावेश याचाही समावेश होते. परिणामी, चेन्नई 4 कोटींच्या मोबदल्यात धोनीला संघात कायम ठेवू शकतं. धोनीच्या आयपीएलमधील भवितव्याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असून, वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. यादरम्यान कोलकाता संघाचा मालक शाहरुख खानने (Shahrukh Khan) धोनीबाबत केलेलं विधान चर्चेत आहे.
नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान सूत्रसंचालन करत असताना दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने निवृत्तीवरुन त्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला. यावर शाहरुख खानने त्याला उत्तर देत मी आणि धोनी सारखेच असल्याचं सांगितलं. आम्ही सारखेच दिग्गज आहोत जे निवृत्ती होईन सांगत 10 वर्ष खेळतो असं शाहरुख म्हणाला.
शाहरुख खान करण जोहरला सांगतो, दिग्गजांची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांना कधी थांबायचं, निवृत्ती कधी घ्यायची असते. यावेळी तो सचिन तेंडुलकर, सुनील छेत्री, रॉजर फेडरर यांची नावं घेतो. त्यावर करण जोहरने मग त्या हिशोबाने तू निवृत्त का होत नाहीस? अशी विचारणा करतो.
यावर उत्तर देताना शाहरुख खान महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतो. शाहरुख म्हणतो की, "मी आणि धोनी एकाच प्रकारचे दिग्गज आहोत. नाही नाही म्हणत 10-12 आयपीएल खेळू जातो". त्यादरम्यान विकी कौशल म्हणतो, निवृत्ती दिग्गजांसाठी असते, पण किंग कायम असतात. त्यानंतर प्रेक्षकही जोरदार टाळ्या वाजवतात.
लिलावापूर्वी सर्व 10 फ्रँचायझींनी 6 खेळाडूंना कायम ठेवण्याची शक्यता कमी असली तरी, ज्या खेळाडूंना संघात रिटेन केल जाण्याची शक्यता आहे अशा काही खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात.
- चेन्नई सुपर किंग्ज :
ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, डॅरिल मिशेल, मथीशा पाथिराना, एमएस धोनी.
- मुंबई इंडियन्स:
हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, अंशुल कंबोज
- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू:
विराट कोहली, मोहम्मद सिराज, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, यश दयाल
- राजस्थान रॉयल्स :
संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा
- कोलकाता नाइट रायडर्स:
श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, फिल सॉल्ट, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा
- गुजरात टायटन्स:
शुभमन गिल, रशीद खान, डेव्हिड मिलर, साई सुधारसन, मोहम्मद शमी, राहुल तेवतिया
- लखनऊ सुपरजायंट्स:
केएल राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, रवी बिष्णोई, मार्कस स्टॉइनिस, मयंक यादव
- दिल्ली कॅपिटल्स:
ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, मिचेल मार्श, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल
2024-09-29T14:12:22Z dg43tfdfdgfd