पावसामुळे 2 दिवस वाया, तरीही टीम इंडियाने मॅच कशी जिंकली? रोहित शर्मा म्हणतो...

India vs Bangladesh : कानपूर कसोटीमध्ये टीम इंडियाने विजय मिळवून 2-0 ने मालिका जिंकली आहे. आर आश्विन आणि जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी आणि यशस्वी जयस्वालचा तडाका बांगलादेशला महागात पडला. दोन दिवस पावसाने खोडा घातल्यानंतर देखील टीम इंडियाने वेळेआधी सामना जिंकला. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या स्पर्धेत टीम इंडिया अव्वल स्थानी कायम राहिली आहे. अशातच सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने यशाचं गमक सांगितलं.रोहित शर्मा काय म्हणाला?आम्ही आहे तसंच खेळत राहिलो. तुम्हाला नेहमी वेगवेगळे व्यक्तीमहत्त्व असलेल्या लोकांसोबत काम करावं लागलं. आधी राहुल भाई होते, त्यांनी आमच्या संघाला आधिक मजबूत बनवलं. आता गौतम गंभीर आमच्यासोबत आहेत, त्यांनी आम्हाला नवी दिशा दाखवली आणि सामना जिंकण्याचं तंत्र दिलंय. दोन दिवस पाऊस आल्याने सामना कसा जिंकायचा यावर आम्ही चर्चा करत होतो. चौथ्या दिवशी आम्ही फक्त त्यांना कसं लवकरात लवकर बाद करायचं? यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. ते पहिल्या डावात किती धावा करतील, यावर सर्व गणित अवलंबून होतं, असं रोहित शर्मा म्हणाला.आम्ही झटपट काम केलं. त्यांना 230 पर्यंत गुंडाळण्याचा प्लॅन होता. खरं सांगायचं तर बॉलर्ससाठी पीचमधून मदत मिळाली नाही, असं म्हणता येईल. पण जेव्हा फलंदाज बॅटिंगला आले तेव्हा सर्वांच्या डोक्यात फिक्स होतं की, कशी बॅटिंग करायची आहे. ही एक जोखीम आम्ही घेण्यास तयार होतो, कारण जेव्हा तुम्ही अशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्ही लवकर बाद होण्याची शक्यता असते. आम्ही 100 ते 150 धावांवर बाद झालो असतो तरी देखील आम्ही रिक्स घेण्यासाठी तयार होतो, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.आणखी वाचा - WTC Points Table : टीम इंडियाची बादशाहत कायम, पण फायनलचा रस्ता क्लियर? बांगलादेशला 'जोर का झटका'दरम्यान, रोहित शर्माने यावेळी आकाश दीपचं देखील कौतूक केलं. आकाश दीपने टीम इंडियामध्ये येण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. त्याने अनेक कला शिकून त्यावर काम केलंय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केल्याने त्याला संधी मिळाली होती. एकूण आमचा प्लॅन असा आहे की, भारताकडे अशा गोलंदाजांचा बंडल असावा, ज्यामुळे तुम्ही कुठंही खेळू शकता. खेळामध्ये दुखापती होत असतात, त्यामुळे गोलंदाज तयार असणं गरजेचं आहे, असंही रोहित शर्मा याने यावेळी म्हटलं आहे.

2024-10-01T10:54:27Z dg43tfdfdgfd