फक्त 18 बॉलमध्ये रोहित अन् जयस्वालची तोडफोड! टेस्ट क्रिकेटमध्ये असं घडलंच नाही

Team India Kanpur Test Record : कानपूरच्या ग्रीन पार्कवर भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जातोय. या सामन्यात अनेक रेकॉर्डची मोडतोड झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता टीम इंडियाच्या सलामीवीर फलंदाजांनी अशी काही कामगिरी केलीये की सर्वांना धक्काच बसलाय. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात फास्ट खेळी केली अन् नवा रेकॉर्ड टीम इंडियाच्या नावे केला आहे.कानपूर टेस्टमध्ये पावसामुळे सामन्याचे अडीच दिवस वाया गेलेत. त्यामुळे टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी नवी रणनिती आखावी लागली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 233 धावांवर बांगलादेशचा डाव गुंडाळला अन् भारताचा संघ फलंदाजीला आला. रोहित शर्मा आणि जयशस्वी जयस्वालने टी-ट्वेंटी अंदाजात फलंदाजीला सुरूवात केली अन् फक्त 3 ओव्हरमध्ये 50 धावा कुटल्या.टी-ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात संघाचं सर्वात फास्ट अर्धशतक ठोकणारा संघ म्हणून टीम इंडियाची नोंद झाली आहे. टीम इंडियाने फक्त १८ बॉलमध्ये 50 धावा केल्या अन् टेस्ट क्रिकेटला नवं वळण दिलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. टी-ट्वेंटी स्टाईलने फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शदमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद आणि खालेद अहमद.

2024-09-30T09:24:03Z dg43tfdfdgfd