पुढारी ऑनलाईन डेस्क : पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ...यानंतर सलग दोन दिवस पावसामुळे वाया गेले... मात्र यानंतर अवघ्या दीड दिवसात अनेक विक्रम नाेंदवत टीम इंडियाने अशक्य ते शक्य करुन दाखवले. फलंदाजांची धडाकेबाज कामगिरी त्याला भेदक गोलंदाजीची साथ मिळाल्याने भारताने आज (दि.१ ऑक्टोबर) कानपूर कसोटीत सात गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. या विजयामुळे बांगला देश विरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकत भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ( WTC ) गुणतालिकेतील आपले अग्रस्थानही कायम ठेवले आहे.
दुसरा आणि तिसरा दिवस पावसाने पूर्णपणे वाहून गेला. त्याचवेळी पहिल्या दिवशी केवळ 35 षटकेच खेळता आली. टीम इंडियाने बांगलादेश पहिल्या डाव २३३ धावांवर गुंडाळला. यानंतर भारताने नऊ विकेट्सवर 285 धावा करून पहिला डाव घोषित केला. टीम इंडियाकडे 52 धावांची आघाडी होती. चौथ्या दिवशी बांगलादेशच्या दोन विकेटही भारताने घेतल्या होत्या. बांगलादेशच्या संघाने मंगळवारी दोन बाद २६ धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि 120 धावा करताना उर्वरित आठ विकेट गमावल्या. बांगलादेशकडून शादमान इस्लामने सर्वाधिक 50 धावा केल्या. त्याने 101 चेंडूत 10 चौकार मारले. याशिवाय आज बाद झालेल्यांमध्ये मोमिनुल हक (2), कर्णधार नजमुल शांतो (19), मुशफिकुर रहीम (37), लिटन दास (1), मेहदी हसन मिराज (9) यांचा समावेश आहे. शकील अल हसन आणि तैजुल इस्लाम यांना खातेही उघडता आले नाही. याआधी सोमवारी झाकीर हसन (10) आणि हसन महमूद (2) बाद झाले. भारताकडून जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर आकाश दीपला एक विकेट मिळाली. बांगलादेशचा दुसरा डाव १४६ धावांवर आटोपला आणि त्यामुळे भारताला विजयासाठी केवळ ९५ धावांचे लक्ष्य मिळाले.
कानपुर कसोटी जिंकण्यासाठी भारताला ९५ धावांचे लक्ष्य मिळाले. विजयाची औपचरिकता पूर्ण करण्यासाठी भारतीय फलंदाज मैदानात उतरले. मात्र तिसर्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा ८ धावांवर बाद झाला. तर पाच षटकात ६ धावांवर खेळणार्या शुभमन गिल याला मिराज याने पायचीत केले. ३४ धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. यानंतर यशस्वी जैस्वाल आणि विराट काेहली यांच्या खेळीने भारताला विजया समीप नेले. १६ व्या षटकात फटकेबाजीच्या नादात जैस्वालने शकीबकडे साेपा झेल दिला. त्याने ४५ चेंडूत ८ चाैकार आणि १ षटकार फटकावत ५१ धावांची खेळी केली. यानंतर १८ व्या षटकात भारताने ९५ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. भारताच्या दुसर्या डावात यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकी खेळीबराेबरच विराट काेहलीची फटकेबाजी लक्षवेधी ठरली. विराट ३७ चेंडूत २९ धावा तर पंत ४ धावांवर नाबाद राहिले.
बुमराह ३, सिराज, अश्विन आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी २ तसेच रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच बांगला देशचा पहिला डाव सर्वबाद २३३ धावांवर गुंडाळला.
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. बांगलादेशने त्यांच्या दुस-या डावाला सुरुवात केली आहे. तत्पूर्वी, भारताने बांगलादेशचा पहिला डाव 233 गारद केला आणि फलंदाजी करताना पहिला डाव 9 गड्यांच्या मोबदल्यात 285 धावांवर घोषित केला. यासह भारताला 52 धावांची आघाडी मिळवली. भारताकडून यशस्वी जैस्वाल (72), केएल राहुल (68) यांनी अर्धशतके झळकावली. विराट कोहली (47) आणि शुभमन गिल (39) यांचे अर्धशतक हुकले. कर्णधार रोहित शर्माने 23 धावांचे योगदान दिले.
2024-10-01T08:41:12Z dg43tfdfdgfd