India vs Bangladesh 2nd Test : कानपूरच्या ग्रीन पार्कवर टीम इंडियाने बांगलादेशचा 7 विकेट्सने पराभव केला अन् दोन सामन्यांची कसोटी मालिका खिशात घातली आहे. पावसामुळे सामन्याचे दोन दिवस वाया गेल्यानंतर टीम इंडियाने बेझबॉलला लाजवेल, अशा अंदाजात फलंदाजी केली आणि वाया गेलेले दिवस भरून काढले. बांगलादेशला फलंदाजीची पूर्ण संधी दिली आणि आपल्याच अंदाजात कसोटी सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलची रेस सोपी केली आहे. कानपूर कसोटी सामन्यात विजय मिळवताच टीम इंडियाने 2-0 ने मालिका जिंकली. त्याचबरोबर टीम इंडियाने भारतात सलग 28 मालिका जिंकल्याच्या पराक्रम केला आहे.पहिल्या दिवशी फक्त 35 ओव्हरचा खेळ होऊ शकला. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा ऐतिहासिक निर्णय रोहित शर्माने घेतला होता. पावसाचा अंदाज सांगितल्याने रोहितने बांगलादेशला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. टीम इंडियाने बांगलादेशला झटपट बाद करण्याचा कार्यक्रम आखला. याला पुर्तता दिली ती आश्विन आणि बुमराह यांनी.. पहिल्या दिवसाचे दोन सेशन वाया गेले.टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शदमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद आणि खालेद अहमद.
2024-10-01T08:39:25Z dg43tfdfdgfd