सर जडेजा! बांगलादेशची एक विकेट घेऊन टेस्टमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

IND VS BAN 2nd Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. टेस्ट सीरिजमधील दुसरा सामना हा कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळवला जात असून चौथ्या दिवशी जडेजाने बांगलादेशची एक विकेट घेऊन इतिहास रचला. जडेजाने बांगलादेशची दहावी विकेट घेतली आणि त्याला भारताचा बेस्ट ऑल राउंडर का म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध केले.  ज्यामुळे बांगलादेशचा खेळ 233 धावांवर आटोपला.  

जडेजाने रचला इतिहास : 

कानपुर टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कहर करून बांग्लादेशच्या फलंदाजांना घाम फोडला. मोमिनुल हक (107) हा फलंदाज वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी कामगिरी करता आली नाही. 75 वी ओव्हर टाकण्यासाठी रवींद्र जडेजाला बॉलिंग देण्यात आली. यावेळी दुसऱ्याच बॉलला जडेजाने बांगलादेशच्या खालेद अहमद याला बाद केले. यासह जडेजाने टेस्ट क्रिकेटमधील ३०० विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. जडेजाने केवळ 73 सामन्यात हे लक्ष गाठले असून जडेजा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा आणि 300 विकेट्स पूर्ण करणारा आशियातील पहिला ऑल राउंडर खेळाडू ठरला आहे.  

पाहा व्हिडीओ : 

दोन दिवसांनी सुरु झाला खेळ : 

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टेस्ट सामना 27 सप्टेंबर पासून कानपुर येथे खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु पहिल्याच दिवशी पावसाच्या आगमनामुळे केवळ 35 ओव्हर खेळवण्यात आल्या. यात भारताने बांग्लादेशच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या आणि बांगलादेशने 107 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याही दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने खेळ एकही बॉल न खेळवता रद्द झाला  तर तिसऱ्या दिवशी मैदान ओलसर असल्याने खेळ रद्द करण्यात आला. 

हेही वाचा : बुमराह ने किया गुमराह... बांगलादेशी बॅट्समनला काही कळायच्या आतच दांड्या गूल; Video पाहाच

 

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज

बांगलादेशची प्लेईंग 11 :

शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार ), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद

2024-09-30T08:42:51Z dg43tfdfdgfd