IPL Auction Controversies : : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल ही क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असते. आयपीएल 2025 साठी लवकरच मेगा लिलाव होणार आहेत. या प्रक्रियेत अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध क्रिकेटर्सवर बोली लावली जाते. दर वर्षी ही लिलाव प्रक्रिया हा उत्सुकतेचा विषय ठरतो. बऱ्याचदा या प्रक्रियेमध्ये मोठे वाद देखील होतात. लिलावाच्या इतिहासात तीन सर्वांत मोठे वाद आतापर्यंत पाहायला मिळाले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.लवकरच आयपीएल 2025 मेगा ऑक्शन अर्थात लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यात मोठ्या क्रिकेटर्सवर बोली लावली जाईल. प्रत्येक टीमकडे कमाल पाच खेळाडू रिटेन करण्याचा अधिकार असेल. तसंच टीम एका खेळाडूसाठी राइट टू मॅचचा (आरटीएम कार्ड) वापर करू शकेल. दर वर्षी हे लिलाव रोमांचक ठरतात. यात अनेकदा वादविवाददेखील होतात. आयपीएल लिलाव प्रक्रियेत आतापर्यंत तीन वाद जोरदार गाजले.युवराज सिंगसाठी दोन संघात वाद2014 मध्ये क्रिकेटर युवराज सिंगबाबत एक मोठा वाद झाला होता. आरसीबी आणि केकेआरमध्ये युवराज सिंगला खरेदी करण्यावरून वाद झाला होता आणि लिलावात बोली दहा कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. लिलावावेळी होस्टने युवराज सिंगला आरसीबीच्या नावावर सोल्ड असं घोषित केलं आणि वादाला सुरुवात झाली. त्यावेळी आपण देखील बोली लावली होती, पण त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केकेआरकडून केला गेला. थोडा विचार करून युवराजवर पुन्हा बोली लावण्यात आली आणि अखेरीस आरसीबीने देशातल्या या दिग्गज ऑलराउंडरला 14 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.आयपीएलचा लिलाव फिक्स?2009 मधल्या लिलावात इंग्लंडचा बॉलर अँड्र्यू फ्लिन्टॉफ सर्वांत महागडा खेळाडू ठरला होता. त्याच्यावर 9.8 कोटी रुपयांची बोली लागली होती. 'आयपीएल 2009 चा लिलाव फिक्स होता. कारण फ्लिन्टॉफला कोणत्याही किंमतीत सीएसकेद्वारे खरेदी केलं जाईल,' असा खुलासा आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी केला होता. यावरून वाद निर्माण झाला होता. पण बीसीसीआयचे तत्कालीन सचिव एन. श्रीनिवासन यांनी ही बाब फेटाळून लावली होती.पंजाब किंग्जचा सावळा गोंधळआयपीएल 2024 च्या लिलावात शशांक सिंह हे नाव समोर आलं. तो छत्तीसगडसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतात. पंजाब किंग्जच्या मालक प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांना विचाराअंती पहिली बोली लावून शशांकचा पंजाब टीममध्ये समावेश करून घेतला. थोड्या वेळाने पंजाब किंग्जच्या मालकांच्या लक्षात आलं, की त्यांनी चुकीच्या शशांक सिंहवर बोली लावली. त्यावर प्रीती झिंटा आणि नेस वाडियाने 32 वर्षांच्या शशांक सिंहला परत करून दुसऱ्या शशांक सिंहवर बोली लावण्याची मागणी केली; पण आयपीएल नियमांनुसार ही मागणी फेटाळली गेली.
2024-09-30T15:24:07Z dg43tfdfdgfd