MEMES: ‘सोन्याच्या चमच्यानं काढलं मैदानातलं पाणी’, ३ दिवस मॅच थांबल्यामुळे प्रेक्षक नाराज, घेताहेत BCCI ची फिरकी

Ind vs Ban: BCCI कडे कोट्यवधी रूपये आहेत पण मैदानात साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी चांगल्या मशिन्स नाहीत. ओल्या मैदानामुळे तीन दिवस मॅच थांबली होती. त्यामुळे संतापलेले चाहते मीम्समधून फिरकी घेत आहेत.

भारत आणि बांगलादेशमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पण पहिले तीन दिवस हा सामना पावसामुळे थांबलेला होता. अखेर चौथ्या दिवशी हा सामना पुन्हा एकदा सुरू झालाय. सध्या बांगलादेशनं दिडशे धावांचा टप्पा ओलांडलेला असून ६ विकेट गमावले आहेत. पण भारतीय क्रिकेट चाहते फारसे खुश नाहीत. कारण BCCI कडे कोट्यवधी रूपये असताना सुद्धा मैदान सुकवायला तीन दिवस लागले. काही जणं तर यावर मजेशीर मीम्स सुद्धा शेअर करताहेत. म्हणताहेत, BCCI सोन्याच्या चमच्यानं मैदानातलं पाणी काढत होती. IND vs BAN मॅचवर व्हायरल होणारे हे मीम्स पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

(फोटो सौजन्य - iplteamstrolls/Instagram, @chixxsays/Twitter)चला २ दिवस IPL वर चर्चा करूया ​

ग्रीन पार्क स्टेडियम ​

टेस्ट मॅच काय होतच राहिल ​

रोहित शर्मा जेव्हा मैदानात येऊन पाणी बघतो ​

IPL ची चर्चा करताना ​

ECB vs BCCI ​

BCCI - जेव्हा मैदान सुकवण्याची वेळ येते ​

जेव्हा तुम्ही अभ्यास न करता परिक्षेला जाता ​

BCCI दोन दिवस काय करत होती? ​

दुसऱ्या टेस्टमॅचमध्ये अम्पायर ​

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-30T06:06:05Z dg43tfdfdgfd