NATASA STANKOVIC : घटस्फोटाला फक्त दोनच महिने, पण नताशा पूलमध्ये करतेय 'या' अभिनेत्यासोबत मज्जा; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

Natasa Stankovic :  भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा मागील काही महिन्यांपासून बराच चर्चेत आलाय. दोन महिन्यांपूर्वी हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिकने (Natasa Stankovic) विभक्त होण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरीही सोशल मीडियावर मात्र दोघे बरेच सक्रिय असतात. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरंच कुतूहल निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं. 

दरम्यान नताशाचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नताशा तिच्या एका मित्रासोबत स्विमिंगपूलमध्ये मज्जा करत असल्याचं पाहायला मिळतंय. पण असं असलं तरीही सोशल मीडियावर मात्र नताशाला खूपच ट्रोल केलं जातंय. 

नताशाचा खास मित्रासोबत व्हिडीओ

नताशाने तिच्या खास मित्रासोबतचा व्हिडीओ शेअर केलाय. अलेक्झांडर ॲलेक्ससोबत नताशा मज्जा करताना दिसतेय. अलेक्झांडरनेच त्याच्या सोशल मीडियावरुन हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तो आणि नताशा स्विमिंगपूलमध्ये मज्जा-मस्ती करत असल्याचं पाहायला मिळतंय. यावरुन नताशावर नेटकरी भडकले आहेत. मागील अनेक दिवसांपासून नताशा आणि अलेक्झांडर एकत्र दिसत आहेत. त्याचप्रमाणे बऱ्याचदा हे दोघेही डेटवर गेले असल्याचं पाहायला मिळालं. 

सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्स करत नताशावर टीका केली आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी हार्दिकसाठी नताशाला ट्रोल केलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नताशाचा हा व्हिडीओ 

नताशा-हार्दिकचा जुलैमध्ये घटस्फोट 

हार्दिकपासून वेगळे झाल्यानंतर नताशा तिचा मुलगा अगस्त्यला घेऊन सर्बियाला गेली होती. मे 2020 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते. यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये नताशा आणि हार्दिकने हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पुन्हा लग्न केले. मात्र, दोघांनी जुलै 2024 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. 

नताशा-हार्दिकच्या घटस्फोटाचे कारण का?

नुकतेच टाईम्स नाऊच्या एका रिपोर्टमध्ये नताशा आणि हार्दिकच्या विभक्त होण्याचे कारण समोर आले आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, एका जवळच्या सूत्राने सांगितले की, हार्दिक जास्त शो ऑफ करायचा तो नताशाला आवडत नव्हता. माणूस म्हणून तो खूप बदलला आहे. अनेक वर्षांपासून नताशाने स्वत:ला  जुळवण्याचा प्रयत्न केला, पण हार्दिकने स्वत:ला बदलले नाही. त्यामुळे शेवटी तिला क्रिकेटरला घटस्फोट घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

ही बातमी वाचा : 

Natasa Stankovic-Hardik Pandya : मुंबईत आल्यानंतर नताशा थेट हार्दिक पांड्याच्या घरी? फोटो काही मिनिटांतच व्हायरल

2024-09-30T15:20:20Z dg43tfdfdgfd