अपराजित भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी अजून किती गुण हवेत; असे आहे वर्ल्डकपचे ताजे समीकरण

नवी दिल्ली: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकप २०२३मध्ये अपराजीत राहिलाय. भारताने आतापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ६ लढतीत विजय मिळवलाय. भारत हा स्पर्धेतील एकमेव संघ आहे ज्याचा एकही पराभव झालेला नाही. टीम इंडिया १२ गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. असे असले तरी भारत अद्याप सेमीफायनलचे तिकीट मिळवू शकला नाही.

भारताने अद्याप सेमीफायनलचे तिकिती निश्चित केले नसले तरी एक चांगली गोष्ट म्हणजे संघाने स्वत:चे भविष्य निश्चित केले आहे. स्पर्धेत भारताच्या अद्याप ३ लढती शिल्लक आहेत आणि त्यात पराभव जरी झाला तरी टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचेल. अर्थात अशी होण्याची शक्यता फार कमी आहे कारण भारत स्पर्धेतील सर्वोत्तम संघ आहे.

सेमीफायनलमधील स्थान पक्के करण्यासाठी भारताला फक्त एक विजय पुरेसा आहे.सध्या १२ गुणांसह भारत अव्वल स्थानी आहे आणि आणखी एक विजय मिळवल्यास भारताचे १४ गुण होतील. त्यानंतर भारत अव्वल ४ संघातून बाहेर पडणार नाही.

भारताच्या शिल्लक लढती श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्याविरुद्ध आहेत. यातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत भारतासाठी थोडीशी कठीण ठरू शकते. अन्य दोन लढतीत मोठा उलटफेर होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे सेमीफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी भारताला फक्त १ विजय पुरेसा आहे. सध्याचे चित्र पाहता भारताचा आफ्रिकेविरुद्ध पराभव जरी झाला तरी अन्य दोन लढतीतील विजयासह भारत १६ गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता अधिक आहे. जर भारताने पुढील सर्व लढती जिंकल्या तर १८ गुणांसह ते अव्वल स्थानावर राहतील.

भारतासह दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. या स्पर्धेत अफगाणिस्तान देखील आहे. ६ पैकी ३ विजयांसह ते गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहेत. शिल्लक ३ पैकी २ लढती त्यांच्यासाठी कठिण आहेत. अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलिया आणि द.आफ्रिकेविरुद्ध खेळायचे आहे. तर अन्य एक लढत नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. अफगाणिस्तानने काही धक्कादायक निकाल नोंदवला तर ती स्पर्धेतील सर्वात मोठी घटना ठरले.

दुसऱ्या बाजूला इंग्लंड, बांगलादेश यांचे आव्हान जवळ जवळ संपुष्ठात आले आहे. त्याची सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. गतविजेत्या इंग्लंडला ६ पैकी फक्त एका लढतीत विजय मिळवता आलाय.

Read Latest Maharashtra News And Marathi News

2023-10-31T08:21:44Z dg43tfdfdgfd