इशानने विराट आणि अय्यरला मैदानात जाऊन काय दिला सीक्रेट मेसेज? श्रेयसने मॅचनंतर स्वतः सांगितलं

कोलकाता : भारतीय संघाने विश्वचषक २०२३ मध्ये सलग ८वा विजय नोंदवला आहे. इडन गार्डन्सवर रोहित सेनेने दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभव केला. या सामन्यात भारताने २४३ धावांनी मोठा विजय मिळवला. एकेकाळी टीम इंडिया अडचणीत दिसत होती. भारत प्रथम फलंदाजी करताना ११व्या ते २५व्या षटकात फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना १५ षटकात केवळ ५२ धावाच करता आल्या. विकेटमध्ये टर्न होता आणि अय्यर विराट धावांसाठी मैदानात झुंजत होते. दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाज सावधान आणि संथ खेळी करत हे पाहून रोहित थोडा अस्वस्थ झाला आणि प्रशिक्षक द्रविड यांच्याशी चर्चा करून इशान किशनकरवी त्या दोघांसाठी मेसेज पाठवला.

रोहित आणि द्रविडने इशानकडे पाठवला मेसेज

विराट कोहली आणि श्रेयस अय्यर फलंदाजी करत असताना रोहित शर्माने इशान किशनला त्या दोघांसाठी मेसेजसह मैदानावर पाठवले. ईशान ड्रिंक्स घेऊन तयार होता तेव्हा राहुल द्रविड आणि रोहित शर्मा बराच वेळ त्याच्याशी बोलत होते. ते इशानला खूप काही सांगताना दिसले. यानंतर लगेचच इशान मैदानात जातो आणि कोहली आणि अय्यरला कर्णधार आणि प्रशिक्षकाचा संदेश देतो. यानंतर भारतीय खेळी अधिक सावरताना दिसली.

इशानने मैदानात जाऊन काय मेसेज दिला?

श्रेयस अय्यरने सामन्यानंतर सांगितले की त्याला संघ व्यवस्थापनाने काय संदेश पाठवला होता. अय्यर म्हणाला, 'कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटचे आभारी आहे की त्यांनी सामना सुरु असताना मेसेज पाठवला कारण मी त्यावेळी थोडासा चिंतेत होतो पण त्यांनी आम्हाला सामन्यात हुशारीने फलंदाजी करण्यास सांगितले. याचा मला सामन्यादरम्यान खूप फायदा झाला.' विराट कोहलीनेही सामन्यानंतर सांगितले की, 'संघ व्यवस्थापनाने त्याला शेवटपर्यंत मैदानात कायम राहण्याचा मेसेज दिला होता.'

अय्यर आणि विराटने १३५ धावा जोडल्या

श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांच्यात १३५ धावांची भागीदारी झाली. संघर्ष केल्यानंतरही अय्यरने विकेट टाकली नाही आणि त्यानंतर त्याला धावा करण्याच्या संधी मिळू लागल्या. त्याने आपली शानदार फटकेबाजी आणि षटकारांची ताकद दाखवून दिली. त्याने ८७ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या. त्याचे शतक हुकले पण बाद होण्यापूर्वी त्याने भारतीय संघाला मजबूत स्थितीत नेले.

2023-11-06T06:01:18Z dg43tfdfdgfd