क्रिकेट विश्वात खळबळ! बंदुकीच्या धाकावर दिग्गज क्रिकेटपटूला लुटलं...सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Fabian Allen Mugged at Gun Point: दक्षिण आफ्रिकेत सध्या साऊथ आफ्रिका प्रीमिअर टी20 क्रिकेट लीग (SAT20) खेळवली जात आहे. लीगमध्ये जबरदस्त चुरशीचे सामने रंगत आहेत. क्रिकेट चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहिला मिळतायत. यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्रीमिअर लीगमध्ये खेळणाऱ्या एका खेळाडूला चक्क बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आलं. वेस्टइंडिजचता स्टार क्रिकेटर फॅबिअन एलनच्या (Fabian Allen) डोक्यावर बंदुक लावत त्याला लुटण्यात आलं. 

बंदुकीचा धाक दाखवत लूट

लूटीची ही घटना जोहान्सबर्गमध्ये (Johansberg) घडली. जोहान्सबर्गमधल्या एका हॉटेलमध्ये फॅबिअन अॅलनची राहाण्याची सोय करण्यात आली आहे. या हॉटेलच्या बाहेरच ही धक्कादायक घटना घडली. एसएटी20 आणि क्रिकेट वेस्टइंडिजने याबाबतची माहिती दिली आहे. सुदैवाने या घटनेत फॅबिअनला कोणतीही दुखापत झालेली नाही. बंदुक घेऊन आलेल्या लुटारुंनी फॅबिअन एलनच्या डोक्याला बंदुक लावली. फॅबिअन सँडटन हॉटेलच्या बाहेर पडताच ही घटना घडली लुटारुंनी फॅबिअनचा मोबाईल फोन, बॅग आणि सोन्याचे दागिने लुटले. घटनेनंतर फॅबिअनने व्यवस्थापनाकडे तक्रार दाखल केली. 

खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

संघाचे मुख्य प्रशिक्षक आंद्रे कोली यांनी फॅबिअनची तब्येत ठिक असल्याचं म्हटलं आहे. पण या घटनेमुळे लीगमध्ये सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ही घटना गांभीर्याने घेतली असून याबाबत अधिक तपास केला जात आहे. 

काय आहे एसएटी20 लीग

दक्षिण आफ्रिकेत आयपीएलच्या धर्तीवर SAT20 लीग सुरु करण्यात आली आहे. यंदाचं हे दुसरं वर्ष आहे. या लीगमध्ये क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. संपूर्ण एक महिना ही लीग खेळवली जाते. यंदा 10 जानेवारीपासून लीगला सुरुवात झाली आणि 10 फेब्रुवारीला या लीगचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. 

एसएटी20 लीगमध्ये 6 संघांनी सहभागी घेतला आहे. हे सर्व संघ आयपीएल फ्रँचाईजीचे आहेत. 2022 मध्ये या लीगसाठी संघांचा लिलाव झाला, त्यावेळी आयपीएलच्या फ्रँचाईजीने बोली लावली होती. गेल्या हंगमात अॅडम मारक्रम कर्णधार असलेल्या सनरायजर्स ईस्टर्न कॅपने जेतेपद पटाकवलं होतं. 

स्पर्धेत कोणते संघ?

सनरायजर्स इस्टर्न कॅप, डरबन सुपर जायंट्स, जोबर्ग सुपर किंग्स, एमआई केपटाऊन, पार्ल रॉटल्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स या संघांचा सहभाग असून अॅडम मारक्रम, फाफ डुप्लेसिस, केशव महाराज, कायरन पोलार्ड, वेन पारनेल आणि डेव्हिड मिलर या संघांचे कर्णधार आहेत. या स्पर्धेत एकूण 30 सामने खेळवले जातात. आयपीएलप्रमाणचे ग्रुप सामन्यांनंतर प्लेऑफचे तीन सामने आणि अंतिम सामना असं या लीगचं स्वरुप आहे. 

2024-02-06T10:06:28Z dg43tfdfdgfd