कोणत्या एका गोष्टीमुळे झाला भारताचा पराभव, कर्णधार उदयने एका वाक्यातच सांगितलं मोठं कारण...

बेनोनी : भारतीय संघाला १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलयाकडून ७९ धावांनी पराभव पत्करावा लागला. पण या भारताच्या पराभवाचे एकच कारण ठरले. भारताचा कर्णधार उदय सहारनने ही गोष्ट फक्त एका वाक्यातच सामना संपल्यावर सांगितली.

भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी २५४ धावांचे आव्हान होते. यापूर्वी भारताने यापेक्षा मोठे आव्हानही पार केले होते. पण यावेळी मात्र भारतीय संघाला हे आव्हान पूर्ण करता आले नाही आणि त्यांचा पराभव झाला. भारताचा फायनलमध्ये पराभव का झाला, याचे एका वाक्यात विश्लेषण उदयने सामना संपल्यावर केले. पराभवानंतर उदय म्हणाला की, " आनच्यासाठी ही स्पर्धा फारच चांगली होती. मला माझ्या संघातील खेळाडूंचा अभिमान आहे. कारण या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी एक चांगले फायटिंग स्पिरीट दाखवले. पण वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत आम्ही काही चुकीचे फटका मारले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर तग धरून राहिले नाहीत आणि त्याचाच सर्वात जास्त फटका आम्हाला बसला, असे मला वाटते. कारण खेळपट्टीवर जास्त काळ आमचे फलंदाज राहीले असते तर चांगल्या भागीदाऱ्या होऊ शकल्या असत्या, ज्या या अंतिम फेरीच्या सामन्यात पाहायला मिळाल्या नाहीत. आम्ही रणनिती तर चांगली आखली होती, पण त्याची योग्य अंमलबजावणी आम्हाला करता आली नाही. आम्ही या स्पर्धेमधून बरेच काही शिकलो आहे. पण इथेच सर्व काही थांबत नाही. आम्हाला अजून शिकायचे आहे आणि पुढे जायचे आहे." सामना संपल्यावर उदयने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण यावेळी त्याने सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे भारताचे फलंदाज खेळपट्टीवर जास्त काळ तग धरून राहू शकले नाहीत. त्यामुळेच भारताकडून चांगल्या भागीदाऱ्या पाहायला मिळाल्या नाहीत आणि त्याचाच फटका भारताला या सामन्यात बसल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय संघाला हा सामना फलंदाजीमुळे गमवावा लागला. कारण यापूर्वी भारताने यापेक्षा जास्त धावा केल्या होत्या. पण या सामन्यात आदर्श सिंगसारखा फलंदाज वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले आणि तेच भारताच्या या पराभवामागचे खरे कारण ठरले आहे. त्यामुळे यावेळी ज्या चुका भारतीय संघाकडून झाल्या त्यामधून ते बरंच काही शिकतील, अशी आशा यावेळी चाहत्यांना नक्कीच असणार आहे.

2024-02-11T16:47:00Z dg43tfdfdgfd