कोण आहे आकाश दीप? इंग्लंडविरूद्धच्या अखेरच्या ३ कसोटींसाठी भारतीय संघात अचानक झाली निवड

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने शनिवारी भारतीय संघाची घोषणा केली. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या फिटनेसची निवड समितीने काही दिवस वाट पाहिली. मात्र, तरीही हे दोघे तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही हे फिटनेसवर अवलंबून आहे. याशिवाय श्रेयस अय्यर या संघाचा भाग नाही तर आवेश खानच्या जागी २७ वर्षीय वेगवान गोलंदाज आकाश दीपला संधी देण्यात आली आहे. आकाशला पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाकडून कॉल आला आहे. अखेर हा खेळाडू कोण आहे, ते जाणून घेऊया.

कोण आहे वेगवान गोलंदाज आकाश दीप?

आकाश दीपला यापूर्वीही मर्यादित षटकांसाठी भारतीय संघाकडून कॉल आला आहे. पण त्याला पहिल्यांदाच कसोटी संघात संधी मिळाली आहे. आकाश दीपने इंग्लंड लायन्सविरुद्ध आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने ३ सामन्यात सर्वाधिक १३ विकेट घेतल्या. आकाश दीपचा जन्म बिहारमध्ये झाला. पण तो बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. आकाशने आतापर्यंत २९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १०३ विकेट घेतले आहेत. एवढेच नाही तर त्याला आयपीएलचा अनुभवही आहे. आकाशने आयपीएलमध्ये खेळलेल्या ७ सामन्यात ६ विकेट घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो.

श्रेयस अय्यरचा पत्ता कटश्रेयस अय्यरलाही शेवटच्या ३ कसोटींसाठी संघातून वगळण्यात आले आहे. मात्र, दुसऱ्या चाचणीनंतर त्याने पाठदुखीची आणि मांडीमध्ये ताण आल्याची तक्रार केल्याचे वृत्त आहे. मात्र बीसीसीआयने त्याला संघातून वगळण्याचे कोणतेही कारण दिले नाही. जडेजा आणि केएल राहुल यांती संघात निवड झाली असली तरीही हे दोघे तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही, हे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून आहे.

शेवटच्या ३ कसोटींसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप

2024-02-11T03:15:26Z dg43tfdfdgfd