ग्लेन मॅक्सवेलची रात्रभर दणकून पार्टी, रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ

ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलसंबंधी एक मोठी घडामोड समोर आली आहे. वर्ल्डकप 2023 चा हिरो ठरलेल्या मॅक्सवेलला तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. दरम्यान मॅक्सवेलला रुग्णालयात दाखल करण्यामागे कोणतीही दुखापत किंवा आजार नसून प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान कारणीभूत ठरलं आहे. मॅक्सवेलने एका पब पार्टीत इतकं मद्यपान केलं की, त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. 

रिपोर्ट्सनुसार, मॅक्सवेलची प्रकृती फारच खालावली होती. एडिलेट येथील एका पबमध्ये त्याने पार्टी केली होती. मॅक्सवेल एका प्रसिद्ध गोल्फ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दाखल झाला होता. यानंतर त्याने पब गाठलं होतं. 

एडिलेटमधील रुग्णालयात दाखल

याच पबमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीचा बँड सिक्स अँड आऊट परफॉर्म करत होता. रिपोर्टनुसार, मॅक्सवेलने यावेळी प्रमाणापेक्षा जास्तच पार्टी केली. यामुळे त्याची तब्येत खालावली. यानंतर त्याला तात्काळ रॉयल एडिलेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

दरम्यान या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, मॅक्सवेल जास्त काळ रुग्णालयात थांबला नाही. उपचारानंतर लगेचच तो परतला होता. त्यामुळे त्याला रात्रभर रुग्णालयात थांबावं लागलं नाही. पण या वृत्तात किती सत्यता आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. रिपोर्ट्सच्या हवाल्याने हे दावे केले जात आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डालाही फार उशिराने याबद्दल माहिती मिळाली आहे. याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. 

एकदिवसीय मालिकेतून विश्रांती

मॅक्सवेल ऑस्ट्रेलिया संघासह ट्रेनिंग कॅम्पमध्ये पोहोचला आहे. कांगारु संघ सध्या वेस्ट इंडिजविरोधात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून जिंकला आहे. दुसरा सामना 25 जानेवारीला होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. जास्त वर्कलोड असल्याने या मालिकेतून मॅक्सवेलला विश्रांती देण्यात आली आहे. 

वेस्ट इंडिजविरोधातील ऑस्ट्रेलिया संघ

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), सीन एबॉट, जेवियर बार्लेट, नाथन एलिस, कैमरन ग्रीन, एरोन हार्डी, ट्रेविस हेड, जॉश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, जेक फ्रेसर, लांस मोरिस, मॅट शॉर्ट, एडम जम्पा

2024-01-22T12:45:06Z dg43tfdfdgfd