मुंबई: वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वर्ल्डकप २०२३ मधील सेमीफायनल लढतीत भारताने प्रथम फलंदाजीकरत ३९७ धावा उभ्या केल्या आहेत. उत्तरादाखल न्यूझीलंडने ३९ धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर डॅरेल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५० धावांची भागिदारी केली.
मोहम्मद शमीने सहाव्या आणि आठव्या षटकात भारताला विकेट मिळवून दिल्या. त्यानंतर केन आणि मिशेल जोडीने संयमी फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीत अनेकदा बदल करून देखील विकेट मिळत नव्हती. २३व्या षटकात रविंद्र जडेजा गोलंदाजी करत होता. अखेरच्या चेंडूवर विल्यमसनने चेंडू पुढे येऊन मारला जो जडेजाच्या हातात आला. जडेजाने चेंडू पुन्हा विकेटच्या दिशने मारला. जो विकेटला लागला नाही तर थेट सीमारेषेच्या दिशने गेले.
जडेजाने चेंडू इतक्या वेगात मारला की विकेटकीपर केएल राहुलने रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याला संधीच मिळाली नाही. जडेजाच्या या कृतीवर कर्णधार रोहित शर्मा देखील नाराज झाला. त्याने हाताने इशारा करत विचारले याची काय गरज होती? राहुलच्या चेहऱ्यावर देखील अशीच प्रतिक्रिया होती.
त्याआधी भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली. रोहित २९ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. त्यानंतर गिल आणि विराट कोहली यांनी संघाला १५०च्या पुढे पोहोचवले. गिल दुखापतीमुळे बाहेर केल्यानंतर विराटने श्रेयस अय्यर सोबत शतकी भागिदारी केली. विराटने वनडे करिअरमधील ५०वे शतक साजरे केले. त्याने सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांचा विक्रम मागे टाकला. तर अय्यरने वनडे करिअरमधील पाचवे आणि या वर्ल्डकपमधील सलग दुसरे शतक झळकावले. भारताकडून शुभमन गिलने नाबाद ८० तर केएल राहुलने नाबाद ३९ धावा केल्या.
Read Latest Sports News And Marathi News
2023-11-15T16:32:08Z dg43tfdfdgfd