ना कॅच, ना फिल्डिंग... तरीही बेस्ट फिल्डर ठरला रोहित शर्मा, कोचने सांगितलं कॅप्टनला का मिळालं मेडल

कोलकाता: विश्वचषकातील टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. रविवारी कोलकाता येथे झालेल्या सामन्यातही भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा तब्बल २४३ धावांनी पराभव केला. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रबळ प्रतिस्पर्धी मानला जात होता पण टीम इंडियाने त्याचा एकतर्फी पराभव केला. या विजयाचे हिरो होते विराट कोहली आणि रवींद्र जडेजा. विराटने शानदार शतक झळकावले तर जडेजाने पाच विकेट घेतले. जडेजाची कामगिरी अप्रतिम होती त्याने गोलंदाजी सोबत शानदार झेलही टिपला. या सामन्यासाठी भारताचा बेस्ट फिल्डर कोण ठरला.

सामना संपल्यानंतर टीम इंडियाने सामन्यातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे नाव जाहीर केले. प्रत्येक सामन्यात एका आगळ्यावेगळ्या आयडियाची हा अवॉर्ड जाहीर केला जातो. यामध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला सुवर्णपदक दिले जाते. या सामन्यात कागिसो रबाडाचा अप्रतिम झेल घेतल्याने जडेजाला हा पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा होती. पण बेस्ट फिल्डरचा पुरस्कार जडेजाने नाही तर दुसऱ्याच खेळाडूने जिंकला.

कोण ठरला बेस्ट फिल्डर

क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी कर्णधार रोहित शर्माला बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कर्णधाराने एकही झेल घेतला नाही आणि धावबादही केला नाही. तरीही रोहित शर्माला सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी सुवर्णपदक देण्यात आले. आता यामागचे कारण काय होते?

रोहितला हा पुरस्कार देण्यामागचे कारण क्षेत्ररक्षण प्रशिक्षकानेच सांगितले. टी दिलीप यांनी सांगितले की, बेस्ट फिल्डरचा पुरस्कार फक्त झेल आणि धावबादसाठी दिला जात नाही. तर, हा पुरस्कारही तुमच्या मैदानावरील प्रयत्नांसाठी दिला जातो. रोहित शर्मा या बाबतीत खूप पुढे होता. एवढेच नाही तर दिलीप यांनी सांगितले की, रोहित शर्माने ज्या पद्धतीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सामना सुरु ठेवला आणि फिल्डिंग सज्ज केली होती ते खूप खास होते. त्यामुळेच बेस्ट फिल्डरचा पुरस्कार रोहित शर्माला मिळाला.

टीम इंडियाचा बेस्ट फिल्डर व्हिडिओची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत असतात कारण प्रत्येक वेळेस काहीतरी भन्नाट पद्धतीने विजेता घोषित केलं जातो. कधी स्पायडरकॅमद्वारे, कधी विशेष प्रकाशयोजनेद्वारे घोषित केले जातात. पण यावेळी टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाने बग्गी कॅमद्वारे बेस्ट फिल्डर कोण हे समोर आले.

सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी चार दावेदार होते. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि रोहित शर्मा यांचा समावेश होता. हा कॅमेरा वारंवार या खेळाडूंच्या चेहऱ्यावर फोकस होऊन फिरत होता, हा कॅमेरा ज्या खेळाडूसमोर थांबेल तो जिंकणार होता आणि यात रोहित शर्मा विजेता ठरला.

2023-11-06T07:01:23Z dg43tfdfdgfd