भारताच्या विजयाचा नेमका काय ठरला टर्निंग पॉइंट, जाणून घ्या पाचव्या षटकात असं घडलं तरी काय...

लखनौ : भारताने इंग्लंडवर धडाकेबाज विजय साकारला होता. भारताला फलंदाजीत जास्त चमक दाखवता आली नव्हती. दुसरीकडे इंग्लंडनेही चांगली सुरुवात केली होती. पण भारताच्या विजयाचा नेमका टर्निंग पॉइंट ठरला तरी काय, हे आता समोर आले आहे.

भारताच्या २३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डेव्हिड मलान आणि जॉनी बेअरस्टोव्ह यांनी दमदार सुरुवात केली होती. इंग्लंडच्या संघाने पाचव्या षटकात ३० धावांपर्यंत मजल मारली होती आणि ते सहाच्या धावगतीने धावा करत होते. त्यावेळी भारताला विकेट मिळवणे सर्वात महत्वाचे होते. यावेळी रोहित शर्माने जसप्रीत बुमराच्या हाती चेंडू दिला आणि त्यावेळी बुमराच्या या षटकात सामन्याचा टर्निंग पॉइंट पाहायला मिळाला. बुमराच्या पहिल्या चारही ेचेंडूंवर भारताला यश मिळवता आले नव्हते. पण यावेळी या पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर सामन्याचा टर्निंग पॉइंट पाहायला मिळाला. बुमराने हा चेंडू भन्नाट टाकला होता. कारण इंग्लंडचा सलामीवीर डेव्हिड मलान हा फलंदाज करत होता. बुमराचा हा चेंडू नेमका कसा आले हे मलानला समजलं नाही. कारण या चेंडूचा वेग सर्वात जास्त होता. बुमराने यावेळी वेगवान चेंडू टाकला आणि त्यामुळे मलानला नेमका चेंडू टप्पा पडल्यावर आपल्याकडे कसा आला, हे समजले नाही. या चेंडूवर खेळताना मलानचे टायमिंग चुकले आणि तो बुमराच्या चेंडूवर चमकल्याचे पाहायला मिळाले. कारण हा चेंडू स्टम्पवर आदळला आणि भारताला पहिली विकेट मिळवता आली. भारतासाठी हा विजयाचा टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण या धक्क्यातून इंग्लंडच्या संघाला सावरता आले नाही. या चेंडूनंतर सहाव्या चेंडूवर बुमराने जो रुटला बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. या विकेटनंतर इंग्लंडचे फलंदाज एकामागून एक बाद होत राहीले आणि हाच भारताच्या विजयाचा टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात दमदार कामगिरी केली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कारण गोलंदाजांनी अचूक मारा करत संघाला विजय मिळवून दिला.

2023-10-29T16:49:03Z dg43tfdfdgfd