भारताविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, मॅचविनर खेळाडूला दिली संधी

नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी आता बांगलादेशने आपला संघ जाहीर केला आहे. या संघात एका मॅचविनर खेळाडूला संधी देण्यात आल्याचे समोर येत आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना संपला की, टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत तीन सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेची सुरुवात ही ६ ऑक्टोबरपासून होणार आहे. हा सामना ग्वालियर येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा टी २० सामना हा ९ ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना नवी दिल्ली येथे होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा टी २० सामना हा १२ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. हा सामना हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

]]>

या टी २० मालिकेसाठी भारताने शनिवारी आपला संघ जाहीर केला होता. भारताच्या संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे कायम ठेवण्यात आहे आहे. पण या संघात जास्त अनुभवी खेळाडू नाहीत. या संघात युवा खेळाडूंचा जास्तीत जास्त भरणार करण्यात आला आहे. सूर्या आणि हार्दिक वगळता या संघात कोणताही अनुभवी खेळाडू नाही. त्यामुळे युवा खेळाडूंना यावेळी संधीचे सोने करण्याची सर्वात चांगली संधी असणार आहे.

बांगलादेशने आपला संघ जाहीर करताना त्यामध्ये काही गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. बांगलादेशच्या या संघात मॅचविनर खेळाडूची निवड करण्यात आली आहे. हा मॅचविनर खेळाडू मेहंदी हसन मिराझ आहे. आतापर्यंत मेहंदीने चांगली कामगिरी केली आहे आणि भारताच्या खेळप्ट्ट्यांवर तो चांगली कामगिरी करू शकतो. त्यामुळे त्याचे बांगलादेशच्या संघात कमबॅक करण्यात आले आहे. बांगलादेशच्या संघाचे कर्णधारपद नजमुल शांतोकडेच ठेवण्यात आले आहे.

भारत आणि बांगालदेश यांच्यात सध्याच्या घडीला कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे झाला होता. हा सामना भारताने जिंकला होता. त्यानंतर भारताचा दुसरा सामना हा कानपूरमध्ये सुरु आहे. पण या कसोटी सामन्याचे पहिले तिन्ही दिवस पावसामुळे वाया गेले आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-29T16:30:58Z dg43tfdfdgfd